नौवहन मंत्रालय
जेएनपीटीने कार्यक्षमता वाढवण्यासाठी दोन मोबाइल एक्स-रे स्कॅनर्सचे उद्घाटन केले
Posted On:
29 JUN 2021 9:23PM by PIB Mumbai
जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी), या भारताच्या प्रीमियर कंटेनर पोर्टवर आजपासून मुंबईतल्या न्हावा शेवा आंतरराष्ट्रीय कंटेनर टर्मिनल आणि एपीएम टर्मिनलमध्ये दोन मोबाइल एक्स-रे स्कॅनर्स असतील. बंदराची कार्यक्षमता वाढवण्यासाठी हा प्रमुख तांत्रिक निर्णय घेण्यात आला आहे. जवाहरलाल नेहरू कस्टम हाऊस येथे जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी आणि कस्टमचे प्रधान आयुक्त यू. निरंजन यांनी हितधारक आणि व्यापारी प्रतिनिधींच्या उपस्थितीत मोबाईल स्कॅनरचे उद्घाटन केले.
तीन मोबाइल कंटेनर स्कॅनर्स, जेएनपोर्टच्या जेएनपीसीटी, डीपी वर्ल्ड आणि एपीएमटी या तीन टर्मिनल्ससाठी प्रत्येकी एक. याप्रमाणे भारतीय पोर्ट असोसिएशनमार्फत खरेदी केली गेली आणि एकूण 101 कोटीं रुपये प्रकल्प खर्चासह बंदराच्या वतीने स्थापित केली गेली. या तीन स्कॅनर पैकी एक स्कॅनर यंदा 30 मार्च रोजी परिचालनासाठी सुरु करण्यात आला . या व्यतिरिक्त, जेएनपीटी भारत मुंबई कंटेनर टर्मिनल्स प्रा.लि. साठी एक ड्राईव्ह-थ्रू कंटेनर स्कॅनर देखील उभारणार आहे. यासाठी एकूण 46.25 कोटी रुपये खर्च येईल. सध्या या प्रकल्पाचे 75 टक्के काम पूर्ण झाले असून मार्च 2022 पर्यंत हे कार्यान्वित होईल.
बंदरांवर कार्यक्षमता वाढवत नवीन मोबाइल कंटेनर स्कॅनर ताशी 20 कंटेनर स्कॅन करेल, ज्यायोगे एक्झिम समुदायाला त्यांचा माल जलद हलवण्यास मदत होईल. हे मोबाइल स्कॅनर टर्मिनल आवारात असलेल्या कंटेनरची तपासणी करण्यात मदत करतील, यामुळे कंटेनरना बाहेर पडण्याची परवानगी देण्यापूर्वी सुरक्षा यंत्रणांना योग्य ती कारवाई करण्याचा फायदा होईल. या सुविधेमुळे व्यापाराला फायदा होईल, कारण नवीन मोबाइल स्कॅनरच्या सहाय्याने त्या तपासणी करून थेट बंदरातून डीपीडी कंटेनर बाहेर पडतील. स्कॅनिंग प्रक्रिया देखील वेगवान होईल, आणि सर्व हितधारकांच्या वेळ आणि किंमतीची बचत होईल.
उदघाटन प्रसंगी जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी म्हणाले की, “नव्याने उद्घाटन झालेल्या मोबाइल एक्स-रे स्कॅनर सुविधेमुळे टर्मिनलच्या आवारातील कंटेनर स्कॅन करण्यास मदत होईल; अशा प्रकारे, कंटेनरमधून बाहेर पडण्याची परवानगी देण्यापूर्वी योग्य ती कारवाई करण्याचा फायदा सुरक्षा संस्थांना होईल. हे स्कॅनर आमची कार्यक्षमता वाढवण्यात मदत करतील आणि प्रत्येक टर्मिनलसाठी स्वतंत्र स्कॅनिंग सुविधांमुळे वेळेत बचत होईल.” या उपाययोजनांद्वारे बंदरांना तंत्रज्ञानदृष्ट्या प्रगत जागतिक दर्जाची बंदरे बनता येईल आणि जगातील आघाडीच्या कंटेनर बंदरांमध्ये जेएनपीटीचे महत्व वाढेल .
***
M.Chopade/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1731288)
Visitor Counter : 153