संरक्षण मंत्रालय
आखाती देशांमधून वैद्यकीय साहित्य घेऊन आलेले भारतीय नौदलाचे शार्दुल जहाज मुंबईत दाखल
प्रविष्टि तिथि:
24 JUN 2021 2:25PM by PIB Mumbai
मुंबई, 24 जून 2021
कुवेत आणि कतार या देशांतून द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजन भरलेले 7,640 सिलेंडर्स, प्रत्येकी 20 मेट्रिक टन द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजन असलेले 2 आयएसओ कंटेनर्स, आणि 15 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स घेऊन आलेले भारतीय नौदलाचे शार्दुल नामक जहाज आज 24 जून 2021 रोजी मुंबई बंदरात दाखल झाले.

आखाती देशांमधून द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजन देशात वाहून आणण्यासाठी या जहाजाची नेमणूक करण्यात आली आहे. कोविड-19 महामारीशी लढा देण्याच्या देशाच्या प्रयत्नांना पाठींबा देण्यासाठी भारतीय नौदलाने सुरु केलेल्या समुद्र सेतू II मोहिमेचा भाग म्हणून ही नेमणूक करण्यात आली आहे.

* * *
U.Ujgare/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1730000)
आगंतुक पटल : 237
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English