गृह मंत्रालय

केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी गांधीनगर लोकसभा मतदारसंघात कोविड लसीकरण केंद्रांची पाहणी केली, तसेच अनेक विकास प्रकल्पांचे केले लोकार्पण

Posted On: 21 JUN 2021 8:38PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 जून 2021

 

एवढी मोठी लोकसंख्या असलेल्या देशात 18 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या सर्व नागरिकांना मोफत लस देण्याचा एक खूप मोठा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे.

  

केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी आज  गांधीनगर लोकसभा मतदारसंघात कोविड लसीकरण केंद्रांची पाहणी केली.  शाह यांनी आपल्या दोन दिवसीय गुजरात दौऱ्याची सुरुवात करत आज अहमदाबादच्या बोडकदेव स्थित पंडित दीनदयाळ उपाध्याय सभागृहात सुरु करण्यात आलेल्या  कोविड लसीकरण केंद्राला भेट देऊन देशभरात आजपासून केंद्र सरकार द्वारा सुरु करण्यात आलेल्या  वॉक-इन लसीकरण व्यवस्थेचे उद्घाटन केले.  अमित शाह यावेळी म्हणाले की पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी  135 कोटी लोकसंख्या असलेल्या देशातील सर्व नागरिकांच्या मोफत लसीकरणाचा खूप मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे, ज्याची आज  योग दिनानिमित्त देशभरात अंमलबजावणी देखील सुरु झाली आहे.

  

केंद्रीय गृह मंत्री म्हणाले की भारत यापूर्वीच जगात सगळ्यांच्या पुढे होता, आता आपण याचा वेग अधिक वाढवू.

 अमित शाह म्हणाले की आजपासून  देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कोरोना विरोधात लढ्याचा एक महत्वाचा टप्पा सुरु होत आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधानांनी  एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता की  21 जून म्हणजेच आजपासून  देशभरात  18 वर्ष आणि त्यापुढील वयोगटातील सर्व लोकांना  केंद्र सरकार कडून  निःशुल्क लस दिली जाईल आणि कोरोना लसीकरणाचा वेग वाढवला जाईल. अमित शाह म्हणाले की मला आशा आहे की देशातील सर्व नागरिकांना कोरोनाविरोधात लढण्यासाठीच केवळ ही लस उपयुक्त ठरणार नाही तर  त्यांचा बचाव करण्यामध्येही ही लस सक्षम असेल.

* * *

S.Patil/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1729179) Visitor Counter : 213


Read this release in: English