आयुष मंत्रालय

आंतरराष्ट्रीय योग दिनी पोस्टाच्या विशेष कॅन्सलेशन शिक्क्याचे अनावरण.

Posted On: 20 JUN 2021 12:07PM by PIB Mumbai

सोमवार दिनांक 21 जून 2021 या आंतरराष्ट्रीय योगदिनी भारतीय टपालविभाग विशेष उपक्रम राबवित आहे. या सातव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त टपालखात्याने आपल्या 810 मुख्य पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून विशेष कॅन्सलेशन शिक्का अनावरीत करण्याचे योजिले आहे.

मागील वर्षापासून संपूर्ण जग हे Covid-19 च्या महामारीने त्रस्त आहे त्यासाठी "घरी राहा, निरोगी राहा" या संदेश पूर्ती साठी योग अत्यंत आवश्यक आहे. त्याचे महत्त्व वाढविण्यासाठी 21 जून 2021 रोजी टपालखाते आपल्या कार्यालयात बुकिंग केलेल्या सर्व टपालावर या दिनाचा विशेष कॅन्सलेशन शिक्का उमटवतील. तरी याची सर्वांनी नोंद घ्यावी की यासाठी सकाळी 10.00 ते सायंकाळी 5.00 ही वेळ निश्चित करण्यात आली आहे.

***

MC/DY/IndiaPost

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1728726) Visitor Counter : 117