सांस्कृतिक मंत्रालय

आंतरराष्ट्रीय योगा दिन: नेहरू विज्ञान केंद्र करणार ऑनलाईन योगा सराव सत्राचे प्रसारण

Posted On: 19 JUN 2021 5:19PM by PIB Mumbai

मुंबई, 19 जून 2021

 

नेहरू विज्ञान केंद्र मुंबई आणि आर्ट ऑफ लिविंग, विशेष सरकारी उपक्रम, महाराष्ट्र यांच्या सहयोगाने सातव्या आंतरराष्ट्रीय योगा दिनाला म्हणजेच 21 जून 2021 रोजी, संध्याकाळी साडेचार ते साडेपाच  या वेळेत नेहरू विज्ञान केंद्रात ऑनलाईन योगा सराव सत्र त्यांच्या https://www.youtube.com/NSCMumbai या यूट्यूब वाहिनीवरून प्रसारित करेल. ‘योग करा घरी रहा’ ही यावर्षीच्या योग दिनाची मुख्य संकल्पना आहे.

स्वतःची संतुलित राहण्याची प्रत्येकाची शक्ती योगाच्या माध्यमातून विकसित होऊ शकते म्हणून आंतरराष्ट्रीय योग दिन 2021 ची मुख्य संकल्पना लोकांनी घरी राहून उत्साही रहावे यावर भर देते. लोकांना विशेषतः विद्यार्थ्यांना घरात कोंडल्यासारखे वाटल्यामुळे त्यांना हताशा जाणवत आहे. योगाच्या क्रिया आणि तंत्रे त्यांना आरोग्य सुधारण्यास मदत करतात, त्याचबरोबर त्यांना आरोग्यपूर्ण तसेच उत्साही राहण्यासाठी मदत करतात. योग केल्यामुळे अनेक मनो-शारीरिक विकार किंवा आजारांना आळा बसतो प्रतिकार शक्ती वाढते तसेच तणावग्रस्त परिस्थितीतून मार्ग काढण्याची क्षमता ही वाढीला लागते . यावर्षीच्या संकल्पना मुख्य कल्पनेनुसार आपले घर हीच योगा दिवस साजरा करण्याची जागा आहे यावर भर देण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या या मुख्य कल्पनेचे स्वागत करून त्यादिवशी आपण घरीच योग करूया.

 

* * *

Jaydevi PS/V.Sahajrao/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1728562) Visitor Counter : 92


Read this release in: English