सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय

दिव्यांग मुलांसाठी क्रॉस डिसेबिलिटी निदान आणि उपचार केंद्र

Posted On: 15 JUN 2021 9:53PM by PIB Mumbai

मुंबई, 15 जून 2021

केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्री डॉ. थावरचंद गेहलोत गुरुवारी (17 जून , 2021) सकाळी नवी दिल्लीतून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून देशाच्या विविध भागात चौदा क्रॉस डिसेबिलिटी निदान आणि उपचार केंद्रांचे (ईआयसी) उद्‌घाटन करतील. राज्यमंत्री कृष्ण पाल गुर्जर आणि  रामदास आठवले हे देखील यावेळी उपस्थित राहणार आहेत. अली यावर  जंग राष्ट्रीय मूक बधिर संस्था (एवायजेएनआयएसएचडी (डी) च्या संकुलातील मुंबई केंद्राचा यात समावेश असेल. त्याशिवाय विविध राज्यांमधील 6 राज्यांमधील 6 राष्ट्रीय संस्था आणि सात  एकत्रित प्रादेशिक केंद्रे (सीआरसी) देखील यात समाविष्ट आहेत. या ऑनलाईन कार्यक्रमादरम्यान  दिव्यांग मुलांसाठी ईआयसीवरील पुस्तिका(हँडबुक) देखील प्रकाशित केले जाईल.

ही 14 केंद्रे मुलांसाठी पूरक  वातावरणामध्ये स्क्रीनिंग, आकलन, श्रवणदृष्टी आणि स्पीच आणि थेरपी व्यवस्थापन यासारख्या विशिष्ट सुविधा प्रदान करतील.  प्रत्येक केंद्रात ऑक्युपेशनल आणि फिजिओथेरपी, स्पीच थेरपी, शैक्षणिक सुविधा  आणि शालेय सज्जतेसाठी पूर्वतयारी वर्ग यासारख्या  विशिष्ट सुविधा आहेत. मुलांना संवाद साधता यावा यासाठी एक विशेष ‘खेळणी व पुस्तक ग्रंथालय’ तयार केले आहे.

पालक आणि व्यावसायिक भागीदारी ईआयसीच्या केंद्रस्थानी आहे आणि म्हणूनच केंद्रात गरजू लाभार्थ्यांसाठी एक विशेष ‘कौटुंबिक शिक्षण कक्ष’उपलब्ध आहे.

ही केंद्रे 6 वर्षापेक्षा कमी वयाचे बालक आणि मुलांकडे लक्ष देतील.

केंद्रीय सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालयाच्या दिव्यांग सशक्तीकरण विभागाने घेतलेल्या निर्णयाचा  परिणाम म्हणून ही केंद्र स्थापन करण्यात आली असून  मूल्यांकन ते  हस्तक्षेप या सर्व सुविधा एकाच छताखाली  उपलब्ध असतील.

दिव्यांग व्यक्ती अधिकर कायदा  2016 मध्ये  एकवीस व्यंगाची  यादी आहे आणि एकाच छताखाली  सर्व दिव्यांग  मुलांना सेवा प्रदान करणे हे या केंद्रांचे उद्दीष्ट आहे.

ही केंद्रे आता मुंबई, चेन्नई, सिकंदराबाद, दिल्ली, देहरादून, कोलकाता, कटक येथील राष्ट्रीय संस्थांमध्ये उपलब्ध होत  आहेत तसेच भोपाळ, नेल्लोर, कोझिकोड, सुंदरनगर, जम्मू-काश्मीर, लखनऊ आणि नाहरलागुन येथील सीआरसी मध्ये देखील बहुविकलांग  मुलांसाठी उपलब्ध  होत आहेत.

 

Jaydevi PS/S.Kane/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1727376) Visitor Counter : 84


Read this release in: English