रेल्वे मंत्रालय

रेल्वेच्या पूर मदत दलाने पावसाळ्यात रेल्वेगाड्यांमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुटका व त्यांच्या मदतीसाठीच्या तयारीची मॉक ड्रिल आयोजित केली


ट्रेनमधील प्रवासी निर्धोक व सुरक्षितपणे आपल्या इच्छित स्थळी पोहोचणे हीच रेल्वेची प्राधान्यता.

“मानवता” ही रेल्वेच्या कामकाजाचा मुख्य गाभा आहे- आलोक कंसल, महाव्यवस्थापक, मध्य व पश्चिम रेल्वे

रेल्वे नेहमीच अडचणीच्या वेळी प्रतिसाद देण्यास आणि सर्वप्रथम पोहोचण्यास तयार असते- अरुण कुमार, महासंचालक, आरपीएफ रेल्वे

पावसाळ्यात रेल्वे पूर मदत दलाच्या बोट आणि आऊटबोर्ड मोटरच्या वापरासाठी मानक कार्यप्रणालीचे आलोक कंसल आणि अरुण कुमार यांनी विमोचन केले

Posted On: 15 JUN 2021 8:09PM by PIB Mumbai

मुंबई, 15 जून 2021

आलोक कंसल, महाव्यवस्थापक  मध्य व पश्चिम रेल्वे अरुण कुमार, महासंचालक रेल्वे सुरक्षा बल, रेल्वे बोर्ड, नवी दिल्ली यांनी पावसाळ्यातील रेल्वेच्या तयारीची तलाव पाळी, ठाणे येथे पत्रकारांना माहिती दिली. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मुंबई उपनगरी भागांवर केलेल्या मान्सूनपूर्व कारवाईची माहिती देताना सांगितले की ,कुर्ला-विद्याविहार, सँडहर्स्ट रोड आणि मशिद, वांद्रे, वसई-नालासोपारा येथे मायक्रो -टनेलिंग पद्धतीने तयार केलेले 7 अतिरिक्त जलमार्गवडाळा-रावळी, पनवेल-कर्जत, बदलापूर-वांगणी आणि कुर्ला-टिळकनगर येथे आरसीसी बॉक्सच्या सहाय्याने तयार केलेले 4 अतिरिक्त जलमार्ग; मागील पावसाळ्यातील पूरग्रस्त ठीकाणी पाण्याचा निचरा होण्यासाठी रुळांच्या बाजूने नाल्यांचे बांधकामपाण्याचा आत येणारा प्रवाह रोखण्यासाठी भिंती बांधणे यासारखे उपाय; ४ लाख घनमीटर घाण/कचऱ्याची विल्हेवाट इत्यादी करण्यात आले.

ते म्हणाले की या पायाभूत सुविधांच्या सुधारणांनी मागील काही वर्षांत उपनगरीय कामकाजात सुधारणा झाली आहे.  अलीकडेच रेल्वेमंत्री, पीयूष गोयल यांनी पावसाळ्याच्या तयारीचा आढावा घेतला आणि एक समग्र आणि दीर्घकालीन योजना अवलंबण्यावर भर दिला.  रेल्वे आणि स्थानिक नगरपालिकांच्या मान्सूनचा पाऊस हाताळण्यासाठी तांत्रिक आणि नागरी कामांच्या उपक्रमांच्या कार्यक्षमतेचा अभ्यास करण्यासाठी आयआयटी मुंबईसारख्या संस्थांशी भागीदारी करावी अशी सूचनाही त्यांनी रेल्वेला केली आहे.

आरपीएफचे महासंचालक अरुण कुमार यांनी संबोधित करतांना सांगितले की, उपनगरीय रेल्वे ही मुंबईची जीवनरेखा आहे.  ते म्हणाले की अशा आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांनी घाबरू नये याची काळजी घेणे ही आमची पहिली कृती असेल.  पावसाळ्याच्या तयारीचा आढावा घेताना मुंबई येथे रेल्वेचे पूर मदत पथक जे आपल्या जवानांद्वारे बोटी वापरतात पाहून रेल्वेमंत्री प्रभावित झाले.  एनडीआरएफतर्फे या  टीमसाठी  प्रशिक्षण दिले जाते. ते म्हणाले की बचाव व मदत कार्यात पोहोचणाऱ्या रेल्वे टीम्स अशा कोणत्याही घटनांसाठी तयार आहेत.

रेल्वे पूर मदत पथकाद्वारे बोट व आऊटबोर्ड मोटर वापरासाठीच्या मानक प्रणालीचे आलोक कंसल आणि अरुण कुमार यांनी विमोचन केले.  त्यांनी तलाव पाळी तलाव, ठाणे येथे रेल्वे प्रोटेक्शन रिलीफ टीमतर्फे (आरएफआरटी) पूरग्रस्त भागात अडकलेल्या रेल्वेमधील प्रवाशांचा बचाव आणि मदत करणा-या  मॉकड्रिलची पाहणी केली.  त्यांनी आरएफआरटी कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांना प्रोत्साहित केले.

प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्त, मध्य रेल्वे अजोय सदानी, प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्त पश्चिम रेल्वे  श्री सिन्हाश्री शलभ गोयल, विभागीय रेल्वे व्यवस्थापकमध्य रेल्वे मुंबई विभाग, आणि इतर अधिकारी या वेळी उपस्थित होते.  याप्रसंगी सर्व कोविड प्रोटोकॉलचे अनुसरण केले गेले.

पार्श्वभूमी

रेल्वे संरक्षण दलाने मोटारयुक्त नौका आणि प्रशिक्षित मनुष्यबळांनी सुसज्ज असलेल्या मुंबई विभागात रेल्वे पूर मदत दल (आरएफआरटी) तयार केला आहे.  पूर आल्यास रेल्वेत मदत मिळावी हा हेतू आहे.  पूर्वतयारी/अंदाज करणे आणि जिथे शक्य असेल तेथे आपत्तींना प्रतिबंध करणे, त्यांचे तीव्रता कमी करणे आणि प्रभावी, वास्तववादी आणि समन्वित नियोजन आखून परिणामांचा सामना करणे आणि एकंदर परिणामकारकता वाढविणे हा उद्देश आहे.

अशाच प्रकारेसुरक्षिततेच्या साधनांनीयुक्त 5 मोटारसह असलेल्या बोटी खरेदी करुन विविध असुरक्षित/ पूरस्थिती निर्माण होऊ शकते अशा ठिकाणी ठेवल्या गेल्या आहेत. या बोटी त्वरित प्रतिसादासाठी आवश्यक तेथे  कोणत्याही ठिकाणी हलविल्या जाऊ शकतात.  प्रत्येक एफआरटी संघात एक उपनिरीक्षक / सहाय्यक उपनिरीक्षक आणि 6 इतर कर्मचारी असतात.  आतापर्यंत 15 आरपीएफ कर्मचारी (5 महिला आणि 10 पुरुष) यानी एनडीआरएफकडून प्रशिक्षण घेतलेले आहेत.  अधिक आरपीएफ जवानांना प्रशिक्षण दिले जात आहे.

ही टीम नेहमीच पावसाळ्यात म्हणजेच दरवर्षी जून ते ऑक्टोबर दरम्यान तत्पर असते. ज्या ठिकाणी पूरस्थितीची नोंद झाली आहे अशा ठिकाणी पाऊस पडण्यावर पथके सातत्याने लक्ष ठेवतात  विशेषत:  समुद्राच्या भरतीवेळी किंवा  हवामान खात्याने अतिवृष्टीचा अंदाज दिला असेल तेव्हा जलमय/पूर असल्याचे कळताच  त्या ठिकाणी ट्रेन अडकलेली असो किंवा नसो तेथे ही टीम पोहोचेल.  हे पथक नागरी प्रशासन, जीआरपी, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि नियंत्रण कक्षामधील समकक्षांशी संपर्क साधेल.  या व्यतिरिक्त, आरपीएफने रेल्वे पूर मदत दलासाठी एक विस्तृत तपशीलवार मानक प्रणाली तयार केली आहे.

निळा इशारा (ब्ल्यू अलर्ट) - जेव्हा पाण्याची पातळी रेल्वे रूळाच्या पातळीपासून चार इंचाच्या वर पोहोचते, तेव्हा याबाबत हालचालीची तयारी सुरू होते.

नारंगी इशारा(ऑरेंज अलर्ट) - जेव्हा पाण्याची पातळी रेल्वेरुळाच्या पातळीपासून पाच इंचाच्या वर पोहोचते तेव्हा टीम त्या स्थानाकडे जाते.

लाल इशारा (रेड अलर्ट) - जेव्हा कोणत्याही स्थानकावर ट्रेन थांबवली जाते तेव्हा त्या ठिकाणी पाण्याची पातळी तीन फूट आहे याची खात्री करुन मदतकार्य सुरू होते.

 

Railway PRO/Jaydevi PS/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1727332) Visitor Counter : 151


Read this release in: English