दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
17 जून रोजी आयोजित होणार विभाग स्तरीय डाक आणि पेन्शन अदालत
Posted On:
09 JUN 2021 5:26PM by PIB Mumbai
पणजी , 9 जून 2021
टपाल सेवा आणि निवृत्तीवेतन यांविषयीच्या जनतेच्या तक्रारी व समस्यांच्या सुनावणीसाठी दि. 17.06.2021 रोजी अनुक्रमे सकाळी 11.00 व दुपारी 12.00 वाजता, 'वरिष्ठ अधीक्षक- टपाल कार्यालये, गोवा विभाग, पणजी-403001' यांच्या कार्यालयात विभाग स्तरीय निवृत्तीवेतन आणि टपाल न्यायालयाचे आयोजन होणार आहे.
तक्रारी 'एएसपी,(मुख्य कार्यालय, वरिष्ठ अधीक्षक-टपाल कार्यालये यांचे कार्यालय, गोवा विभाग, पणजी-403001)' यांच्या नावे लिहून सदर पत्त्यावर व्यक्तिशः आणून द्याव्यात किंवा टपालाने पाठवाव्यात. ज्या तक्रारी व समस्यांना सहा आठवड्यांच्या आत उत्तर पाठवण्यात आलेले नाही, त्याच विचारात घेतल्या जातील. एका अर्जात केवळ एकच तक्रार पाठविता येईल. मूळ तक्रार ज्या अधिकाऱ्यांना उद्देशून लिहिली होती, त्या अधिकाऱ्यांचे नाव व पदनाम आणि त्या मूळ तक्रारीचा दिनांक यांचा उल्लेख करणे आवश्यक आहे. मूळ तक्रारीच्या प्रतीसह अर्ज, दि.14.06.2021 रोजी किंवा त्यापूर्वी पोहोचेल अशा पद्धतीने पाठवणे आवश्यक आहे. तक्रारदार/निवृत्तिवेतनधारक व्यक्तीची इच्छा असल्यास त्या व्यक्तीला स्वखर्चाने या दिवशीच्या न्यायालयात हजर राहता येईल.
S.Tupe/J.Waishampayan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1725665)
Visitor Counter : 133