माहिती आणि प्रसारण मंत्रालय
के. ए. अब्बास यांचे जीवन आणि कार्य उलगडणारा फिल्म्स डिव्हिजनने निर्माण केलेला माहितीपट, त्यांच्या जयंती दिनानिमित्त दाखविला जाणार
Posted On:
06 JUN 2021 7:57PM by PIB Mumbai
मुंबई, 6 जून 2021
प्रसिद्ध चित्रपट निर्माता,पटकथा लेखक, कादंबरीकार, नाटककार, लघुकथा लेखक आणि पत्रकार ख्वाजा अहमद अब्बास उर्फ के ए.अब्बास यांच्या 107 व्या जयंतीनिमित्त त्यांच्यावर फिल्म्स डिव्हिजनने तयार केलेला 'आय हॅव समथिंग टू से ...के ए अब्बास’ हा माहितीपट 7 जून 2021 रोजी प्रसारीत केला जाणार आहे. हा चित्रपट फिल्म्स डिव्हिजनच्या https://filmsdivision.org/ या संकेतस्थळावर प्रसारीत करण्यात येईल.

धरती के लाल, सात हिंदुस्तानी, परदेसी, शहर और सपना आणि दो बूंद पानी यासारख्या पुरस्कार विजेत्या सामाजिक-वास्तववादी चित्रपटांच्या दिग्दर्शनासाठी आणि जागते रहो, आवारा, नीचा नगर, श्री 420, मेरा नाम जोकर आणि इतर अनेक लोकप्रिय चित्रपटांचे पटकथा लेखन असलेले अब्बास यांचे चित्रपट सामान्य माणसाच्या हिताचे आणि चिंतांच्या मुळाशी जाणारे असत. के ए अब्बास यांना उर्दू, इंग्रजी आणि हिंदी भाषेतील साहित्याचा, ज्यात इन्क्लाब या उत्तम कादंबरीचा समावेश आहे, यासाठीही त्यांचे स्मरण केले जाते. मुकेश शर्मा दिग्दर्शित हा फिल्म्स डिव्हिजनचा माहितीपट आर्किव्हल फिल्मिक मटेरियलच्या सर्जनशील वापराद्वारे या दिग्गजाचे जीवन आणि कालावधी दर्शविण्याचा प्रयत्न करतो.
S.Thakur/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1724977)
Visitor Counter : 182