वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
2020-21 मध्ये भारताकडून 11,49,341 मेट्रिक टन सीफूडची निर्यात
कोविड, मंदावलेला बाजार, लॉजिस्टिक्सविषयक समस्यांमुळे 10.88% घसरण , मात्र शेवटच्या तिमाहीत सुधारणा : एमपीईडीए अध्यक्ष
मत्स्यशेती क्षेत्राची उत्तम कामगिरी ; तिलापिया आणि शोभेच्या माशांच्या निर्यातीत वाढ
Posted On:
05 JUN 2021 9:41PM by PIB Mumbai
कोविड महामारी आणि मंदावलेल्या परदेशातील बाजारपेठा यांचा परिणाम भारताच्या सागरी खाद्य (सीफूड )क्षेत्रावर देखील झाला . आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये, भारताने 43,717.26 कोटी रुपये (US$ 5.96 billion) किमतीच्या 11,49,341 मेट्रिक टन सागरी उत्पादनांची निर्यात केली , ज्यात मागील वर्षाच्या तुलनेत 10.88 टक्के घट झाली आहे.
“महामारीने वर्षाच्या पहिल्या सहामाहीत सागरी खाद्य निर्यातीवर प्रचंड परिणाम झाला , मात्र 2020-21 च्या शेवटच्या तिमाहीत त्यात चांगली सुधारणा झाली. मत्स्यशेती क्षेत्राने डॉलरच्या बाबतीत निर्यातीत 67.99 टक्के आणि संख्यात्मक बाबतीत प्रमाणात 46.45 टक्के योगदान दिले जे 2019-20 च्या तुलनेत 4.41 टक्के आणि 2.48 टक्क्यांनी अधिक आहे." असे सागरी उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (एमपीएडीए) चे अध्यक्ष .के.एस. श्रीनिवास यांनी सांगितले.
अमेरिका, चीन आणि युरोपियन महासंघ आघाडीचे आयातदार होते, तर गोठवलेल्या मासळीनंतर गोठवलेल्या कोळंबीने प्रमुख निर्यात उत्पादन म्हणून स्थान कायम राखले.. 2019-20 मध्ये भारताने, 46,662.85 कोटी रुपये (6.68 अब्ज अमेरिकन डॉलर्स) किमतीच्या 12,89,651 मेट्रीक टन सीफूडची निर्यात केली होती , ज्यात 2020-21 मध्ये रुपयाच्या बाबतीत 6.31 टक्क्यांची घट आणि डॉलरच्या बाबतीत 10.81 टक्के घट झाली.
2,91,948 मेट्रिक टन आयातीसह अमेरिका भारतीय सीफूडचा प्रमुख आयातदार असून डॉलरच्या बाबतीत त्याचा वाटा 41.15 टक्के आहे. त्या देशाला केलेल्या निर्यातीत रुपयाच्या मूल्यात 0.48 % टक्के वाढ झाली , मात्र संख्या आणि डॉलर्सच्या बाबतीत अनुक्रमे 4.34 टक्के आणि 4.35 टक्क्यांनी घट झाली.
939.17 दशलक्ष डॉलर्स मूल्याच्या 2,18,343 मेट्रीक टन सीफूडच्या आयातीसह चीन दुसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ आहे. डॉलरच्या उत्पन्नात 15.77 टक्के आणि संख्यात्मक दृष्ट्या 19 टक्के वाटा आहे. मात्र या देशाला केलेल्या निर्यातीत संख्यात्मक दृष्ट्या 33.73 टक्के आणि डॉलरच्या अनुषंगाने .31.68 टक्क्यांनी घट झाली आहे.
डॉलर मूल्यात 13.80 टक्के वाटा असणारा युरोपियन महासंघ तिसरा सर्वात मोठा आयातदार आहे. मात्र युरोपियन महासंघातील देशांना केलेल्या गोठवलेल्या कोळंबीच्या निर्यातीत अनुक्रमे 5.27 टक्के आणि 6.48 टक्के घट झाली.
दक्षिण पूर्व आशिया खंडातील निर्यातीत डॉलर स्वरूपात 11.17 टक्के वाटा होता. मात्र संख्यात्मकदृष्टया 2.56 टक्के आणि डॉलरच्या उत्पन्नात 5.73 टक्क्यांनी घसरण झाली. डॉलरच्या बाबतीत 6.92 टक्के वाटा असलेल्या पाचव्या क्रमांकाचा आयातदार जपानमधील निर्यात 10.52 टक्क्यांनी वाढली तर डॉलरच्या मूल्यात 2.42 टक्क्यांनी घट झाली.
डॉलरच्या बाबतीत 4.22 टक्के वाटा असलेला मध्य पूर्व सहाव्या क्रमांकाचा आयातदार असून संख्यात्मकदृष्टया 15.30 टक्के आणि डॉलरच्या अनुषंगाने 15.51 टक्क्यांनी घट झाली.
श्रीनिवास म्हणाले की, महामारी बरोबरच इतरही अनेक कारणांमुळे 2020-21 दरम्यान सागरी खाद्याच्या उत्पादनावर नकारात्मक परिणाम झाला. मासेमारीचे कमी दिवस , मंदावलेली वाहतूक व्यवस्था आणि बाजारातील अनिश्चिततेमुळे उत्पादनाचा विचार करता मासे मिळण्याचे प्रमाण कमी झाले. मासेमारी व प्रक्रिया करणार्या कारखान्यांमधील कामगारांची कमतरता, सागरी बंदरांवर कंटेनरची कमतरता, विमान वाहतुकीचे वाढीव शुल्क आणि उड्डाणांच्या मर्यादित उपलब्धतेमुळे निर्यातीवर परिणाम झाला.
परदेशातील बाजारपेठेतील परिस्थिती निरुत्साही होती. चीनमध्ये कंटेनरची कमतरता, मालवाहतूक शुल्कामध्ये वाढ आणि सागरी खाद्य उत्पादनांच्या खेपांच्या कोविड चाचणीमुळे बाजारातील अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले. अमेरिकेत कंटेनरच्या कमतरतेमुळे निर्यातदारांना वेळेत मागणीची पूर्तता करणे कठीण झाले.
हॉटेल, रेस्टॉरंट आणि कॅफे बंद असल्याने यांचाही मागणीवर परिणाम झाला. जपान आणि युरोपियन महासंघच्या देशांमध्ये कोविड लॉकडाऊनमुळे किरकोळ विक्रेते , रेस्टॉरंट्स, सुपरमार्केट्स आणि हॉटेलमधील मागणी मंदावली.
***
S.Patil/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1724836)
Visitor Counter : 142