सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय

अली यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हियरिंग डिसएबिलिटीज साजरा करत आहे जागतिक पर्यावरण दिन


केंद्रीय मंत्री रामदास आठवले करणार आभासी  उत्सवाचे उद्घाटन

दिव्यांग व्यक्ती आणि त्यांच्या पालकांसाठी 'सॅप्लिंग ऑफ होप : द न्यू बिगिनिंग' या विषयावर वेबिनारचे आयोजन

Posted On: 02 JUN 2021 6:25PM by PIB Mumbai

मुंबई : 2 जून 2021

अली यावर  जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हियरिंग डिसएबिलिटीज (दिव्यांग) यंदाचा जागतिक पर्यावरण दिन’ (5 जून 2021) 'पुनर्कल्पना, पुनर्निर्मिती,आणि परिसंस्थेचे पुनर्निर्माण' या संकल्पनेनुसार साजरा करत आहे. या वर्षीच्या  जागतिक पर्यावरण दिनाची संकल्पना परिसंस्थेचे पुनर्निर्माण अशी आहे.

केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण राज्यमंत्री रामदास आठवले, 5 जून रोजी सकाळी 11 वाजता वांद्रे पश्चिम रेक्लमेशन इथल्या संस्थेच्या परिसरात  वृक्षारोपण करून आणि  दिव्यांगमुलांना औषधी वनस्पतींचे  वाटप करून आभासी उत्सवाचे उद्घाटन करतील.

या कार्यक्रमात दिव्यांग व्यक्ती आणि त्यांच्या पालकांसाठी विशेषतः  मूकबधिर व्यक्ती आणि त्यांच्या पालकांसाठी  'सॅप्लिंग ऑफ होप :द न्यू बिगनिंग' या  व्हर्च्युअल इंटरएक्टिव राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमासाठी नोंदणी  या लिंकद्वारे ऑनलाइन पद्धतीने करता येईल.  https://ayjnihh.webex.com/ayjnihh/j.php?MTID=m68a6aa9927a5776bf9573026db0370cc  

अधिक माहितीसाठी कृपया संपर्क साधावा- 9869993833

परिसंस्थेच्या पुनर्निर्माणासाठी आवश्यक असलेल्या निसर्गाशी जवळीक साधणाऱ्या जागतिक मोहिमेत सहभागी होण्यासाठी दिव्यांग व्यक्तींना प्रोत्साहन मिळावे, यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. परिसंस्थेच्या पुनर्निर्माणासाठी अनेक प्रकारे हातभार लावता येईल, जसे की, वृक्षारोपण, हरित शहरे, बागा, आपल्या आहारविहारात बदल, नद्या आणि समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता.

अली यावर  जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हियरिंग डिसएबिलिटीज (दिव्यांग) ही संस्था भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाच्या दिव्यांग व्यक्ती सबलीकरण विभागाच्या अंतर्गत, देशभरातल्या मूकबधिर दिव्यांग व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी काम करणारीसर्वोच्च राष्ट्रीय संस्थांपैकी एक संस्था आहे.

***

M.Chopade/S.Kakade/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1723824) Visitor Counter : 152


Read this release in: English