विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

CSIR-CMERI च्या ऑक्सिजन तंत्रज्ञानाची ओळख करुन घेण्यासाठी महाराष्ट्र एमएसएमई क्षेत्रातल्या कंपन्यांचे आभासी वेबिनार

Posted On: 27 MAY 2021 8:57PM by PIB Mumbai

 

सीएसआयआर- केंद्रीय मेकॅनिकल अभियांत्रिकी संशोधन संस्थेने विकसित केलेल्या ऑक्सिजन एनरिचमेंट टेक्नोलॉजीची माहिती देण्यासाठी आज मुंबईतील एमएसएमई विकास संस्थेने, औरंगाबादच्या इंडो-जर्मन टूल रुमच्या सहकार्याने आभासी वेबिनारचे आयोजन केले होते. CSIR-CMERI चे संचालक, प्रो हरीश हिरानी यांनी मुख्य वक्ते म्हणून या वेबिनारची सुरुवात केली. या दोन्ही संस्थांनी मिळून विकसित केलेल्या, ऑक्सिजन उपलब्धता वाढवणाऱ्या तंत्रज्ञानाविषयी आणि भविष्यातील प्रगतीविषयी त्यांनी माहिती दिली. या भागातील, आणि इतर ठिकाणच्या अनेक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रांचे अनेक प्रतिनिधी या वेबिनारमध्ये सहभागी झाले होते. तसेच,चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया आणि चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर अँड मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर या संस्थांचे प्रतिनिधी देखील उपस्थित झाले होते.

CSIR-CMERI  चे संचालक हरीश हिरानी यांनी सांगितले की वैज्ञानिक तथ्यांनुसार, आपण पूर्ण श्वासोच्छवास प्रक्रियेत केवळ एक तृतीयांश काळात श्वास आत घेत असतो. मात्र, या तथ्याचा विचार न करता, रूग्णांना कृत्रिम ऑक्सिजनचा पुरवठा करतांना तो पूर्ण वेळ केला जातो. याचा अर्थ असा की, सध्याच्या पद्धतीनुसार, आपल्या रुग्णांना दिल्या जाणाऱ्या ऑक्सिजनपैकी दोन तृतीयांश ऑक्सिजन वाया जात असतो. त्याशिवाय, वैद्यकीय मासिकांमधील माहितीनुसार, आपल्या नासिकेतील नलिकेचा मास्कविना वापर केल्यास, त्यातून आजूबाजूच्या लोकांना पॉझिटिव्ह रूग्णाकडून विषाणू संसर्ग होण्याचा धोका असतो. तसेच, ज्या रुग्णांना फुफ्फुसांचे विकार  आहेत, त्यांच्यासाठी एन-95 मास्कचा वापर देखील त्रासदायक ठरू शकतो. तसेच, एखाद्या व्यक्तीला नैसर्गिक हवेतून, 21 टक्के ऑक्सिजन मिळत असेल, तर त्याला कृत्रिमरीत्या 100 टक्के ऑक्सिजन देणे त्याच्या प्रकृतीसाठी हानिकारक ठरू शकते.

हे सगळे लक्षात घेता, रुग्णांना योग्य ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी, विकेंद्रित पातळीवर उपाय शोधणे अत्यावश्यक गरज ठरली आहे. आज बाजारात उपलब्ध असलेले बहुतांश ऑक्सिजन तंत्रज्ञान संसर्गजन्य आजारावर उपचार करणारे नसून, केवळ उपचारात्मक वापरासाठी उपलब्ध आहे.

त्यामुळेच, या क्षेत्रात पर्यायी पद्धतींवर अधिक संशोधन आणि सुधारणा करण्याची गरज भासली. हे लक्षात घेऊन,CSIR-CMERI ने ऑक्सिजन एनरिचमेंट टेक्नोलॉजी म्हणजे ऑक्सिजनची उपलब्धता वाढवणारे तंत्रज्ञान विकसित केले आहे. हे तंत्रज्ञान म्हणजे, ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर ची पुढची पायरी आहे. CSIR-CMERI ऑक्सिजन एनरिचमेंट टेक्नोलॉजी मध्ये, सध्या असलेल्या उपकरणांमधल्या अनेक त्रुटी दूर करण्यात आल्या आहेत.

MSME-DI, चे सहसचिव एन एन एस्टोलकर यांनी वेबिनारचे प्रास्ताविक करत, CMERI चे अत्याधुनिक तंत्रज्ञान शिकणे हा संस्मरणीय अनुभव होता, असे सांगितले.

एमएसएमई- DIचे संचालक, ए. आर. गोखे यावेळी  म्हणाले की, सध्या संपूर्ण जगासाठी हा खडतर कसोटीचा काळ आहे. आणि याच काळात अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण समाजाला दिलासा देण्याचा प्रयत्न करु शकतो. सध्याच्या परिस्थितीचा फटका एमएसएमई क्षेत्रालाही बसला आहे. त्यामुळेच, भारतीय तंत्रज्ञानातून मिळणारी नवी कल्पना, नवी सुरुवात, एमएसएमई साठी नवे मार्ग सुरु करणारी आहे तसेच, देशाच्या तंत्रज्ञान क्षमता अधिक मजबूत करणारीही आहे.

इंडो-जर्मन टूल रूम चे व्यवस्थापकीय संचालक, औरंगाबादएच डी कापसे यांनी यांनी CSIR-CMERI च्या देशभरातील एमएसएमई क्षेत्रांपर्यंत पोचण्याच्या प्रयत्नाबाबत, प्रो. हरीश हिरानी यांचे आभार मानले. एमएसएमई क्षेत्र, अशा भारतीय तंत्रज्ञानाचा अंगीकार करण्यास अत्यंत उत्सुक आहे, असे ते म्हणाले. इंडो-जर्मन टूल रूमकडून या प्रयत्नांना नक्कीच मदत केली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.

आयजीटीआर ने देखील समाजाच्या कल्याणासाठी CSIR-CMERI  सोबत सहकार्य करण्याची तयारी दर्शवली.

SIDBI चे सहव्यवस्थापकीय संचालक, भगवान चंदनानी, यांनी एमएसएमई क्षेत्राला, वित्तीय सहकार्य मिळावे यासाठी केंद्र सरकारसोमोर या तंत्रज्ञानाचे सादरीकरण केले. SAFE, SHWAS किंवा AROG च्या माध्यमातून हे सहकार्य केल्यास, त्यांना देशभरात, ते तंत्रज्ञान वापरता येईल, असे चंदनानी म्हणाले.

***

S.Tupe/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1722292) Visitor Counter : 260


Read this release in: English