आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 च्या योग्य प्रतिबंधात्मक हाताळणीबद्दल आरोग्य मंत्रालयाकडून मुंबई आणि पुणे मॉडेलचे कौतुक
या मॉडेल्सची अंमलबजावणी राष्ट्रीय पातळीवर व्हायला हवी: आरोग्य सचिव
Posted On:
11 MAY 2021 6:51PM by PIB Mumbai
मुंबई/दिल्ली, 11 मे, 2021
कोविड-19 संसर्ग नियंत्रणासाठी मुंबईने अमलात आणलेले विकेंद्रीकरणाचे मॉडेल देशपातळीवर राबवण्याची गरज. “नागरिकांना संपर्क साधता यावा, त्यांच्या अडचणी सांगता याव्यात, यासठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले होते, मात्र ते महापालिका पातळीवर नाही, तर वॉर्ड पातळीवर तयार करण्यात आले होते. 24 वॉर्डासाठी प्रत्येकी एक असे 24 नियंत्रण कक्ष स्थापण्यात आले होते. मुंबई महापालिकेकडे जे रुग्णचाचणीचे रिझल्ट येत, ते संबंधित वॉर्डातल्या नियंत्रण कक्षात पाठवले जात. हे कक्ष केंद्र म्हणून काम करत आणि त्यानुसार प्रत्येक वॉर्डात रुग्णसंख्या कमी करण्यावर भर देण्यात आला. प्रत्येक वॉर्डरूम मध्ये 30 दूरध्वनी लाईन्स होत्या, त्या सांभाळण्यासाठी 10 फोन ऑपरेटर्स, 10 डॉक्टर्स आणि 10 रुग्णवाहिका होत्या. तसेच, खाटांची उपलब्धता सांगणारे 10 डॅशबोर्ड देखील या कक्षांमध्ये लावण्यात आले. या सर्व प्रयत्नांमुळे रूग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी लोकांना काहीही त्रास झाला नाही.” अशी महिती केंद्रीय आरोग्य विभागाचे सह सचिव लव अग्रवाल यांनी दिली. नवी दिल्लीत आज त्यांनी प्रसारमाध्यमांना कोविडच्या उपाययोजना आणि सद्यस्थितीबाबत माहिती दिली.
“याशिवाय, 800 SUV गाड्या तात्पुरत्या रुग्णवाहिका म्हणून रुपांतरीत करण्यात आल्या होता. या सर्व रुग्णवाहिकांचा माग काढत त्यांचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी एक सॉफ्टवेअर प्रोग्राम तयार करण्यात आला. या सर्व व्यवस्था समन्वय राखून योग्यप्रकारे काम करत होत्या, जेणेकरुन रुग्णांना बेड मिळण्यात काहीही अडचण येऊ नये.” असे सांगत, अग्रवाल यांनी मुंबई महानगरपालिकेच्या या योजनाबद्ध प्रयत्नांचे कौतुक केले.
पुण्यानेही कोविड-19 च्या रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी मिळवलेल्या यशाबद्दल, आरोग्य मंत्रालयाने पुण्यातील यंत्रणांचेही कौतुक केले. संसर्गाचे प्रमाण कसे नियंत्रणात आणता येईल, यासाठी या उपाययोजना आदर्श उदाहरण ठरल्या आहेत.
जेव्हा पुण्यात, रुग्ण पॉझिटिव्ह असण्याचे प्रमाण 69.7% होते, त्यावेळी पुण्यात रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत या काळासाठी कठोर संचारबंदी सारख्या उपाययोजना करण्यात आल्या, याचे दोन परिणाम दिसले:
1) कोविड रूग्णांच्या वाढीचे प्रमाण कमी झाले.
2) कोविड रुग्ण पॉझिटिव्ह होण्याचा दर कमी झाला. आधी 41.8% असलेला हा दर 23.4 %. पर्यंत कमी झाला.
“मोठे समारंभ, लोकांची गर्दी यावर निर्बंध, अत्यावश्यक नसलेल्या कामांवर प्रतिबंध घालण्यासारखे कठोर उपाय साधारण 15 दिवसांसाठी केल्यावर, रुग्णवाढीचा दर कमी होतो आणि रुग्णवाढीचा चढता आलेख सपाट व्हायला सुरुवात होते, असे आमचे निरीक्षण आहे.” असे आरोग्य विभागाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले.
MC/RA/PM
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1717750)
Visitor Counter : 201