रेल्वे मंत्रालय
दोन ऑक्सिजन एक्स्प्रेसच्या माध्यमातून महाराष्ट्राला 174 मेट्रिक टन द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा
Posted On:
05 MAY 2021 6:55PM by PIB Mumbai
मुंबई, 5 मे 2021
मध्य रेल्वेची पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस महाराष्ट्रातील कळंबोली इथून आंध्रप्रदेशच्या विशाखापट्टणम येथे आणि नंतर ऑक्सिजन टॅंकर्स घेऊन नाशिकला परत आली होती. राज्य सरकारकडून ही विनंती आल्यावर लगेचच रेल्वे मंत्रालयाने ऑक्सिजन एक्सप्रेस पाठवण्याचे आव्हान पेलत ताबडतोब तशा हालचाली सुरु केल्या. द्रवरूप ऑक्सिजन टॅंकर्सची वाहतूक करण्यासाठी विविध ठिकाणी रॅम्प देखील तयार करण्यात आले होते.
मध्य रेल्वेच्या चमूने ऑक्सिजन एक्सप्रेससाठी कळंबोली इथे केवळ 24 तासांत रॅम्प तयार केला.
रो-रो सेवेच्या वाहतुकीसाठी मध्य रेल्वेला प्रवासाचा संपूर्ण नकाशा सगळ्या अडी अडचणी लक्षात घेऊन तयार करावा लागला होता. त्यात घाट, पूल, बोगदे, वळणे, प्लॅटफॉर्मचे छत, ओव्हरहेड वायर इत्यादी अडचणींचा विचार करावा लागला होता. या सगळ्या वाहतुकीत ‘उंची’ हा अत्यंत महत्वाचा मुद्दा होता, त्यामुळे हा मार्ग वसईकडून आखण्यात आला. रस्त्यावरील टॅंकर T1618 ची उंची 3320 मीमी असते, त्यामुळे त्याला सपाट वैगनवर ठेवावे लागले. वसईमार्गे लांबचा रस्ता निवडण्याचे कारण मुंबई विभागात येणाऱ्या घाटभागातून, अति मोठी मालवाहतूक करण्याची परवानगी नाही.
महाराष्ट्राला दोन ऑक्सिजन एक्सप्रेसमधून आलेला 174 मेट्रिक टन द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजन मिळाला आहे. त्याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे :
पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस: 126 मेट्रिक टन
टॅंकर्स- 7
कुठून - विशाखापट्टणम
कुठे - नागपूर(3), नाशिक (4)
(नागपूरला आगमन 23.04.2021 आणि नाशिकला आगमन 24.04.21)
दुसरी ऑक्सिजन एक्सप्रेस : 48 मेट्रिक टन
टॅंकर्स- 3
कुठून – हापा
कुठे -कळंबोली
(आगमन : 26.04.21)
* * *
M.Chopade/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1716319)
Visitor Counter : 140