सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
सी.आर.सी., नागपूरद्वारे दिव्यांग व्यक्तींसाठी कोरोना विषाणूसंदर्भातील मानसिक समस्यांसाठी ऑनलाईन सेवा सुरु
Posted On:
05 MAY 2021 6:03PM by PIB Mumbai
नागपूर, 5 मे 2021
दिव्यांग व्यक्तींच्या मनात कोरोना विषाणूसंदर्भातील मानसिक भिती आणि समस्या यावर समुपदेशन, मार्गदर्शन तथा प्रशिक्षण देण्याकरिता केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाच्या अधीन असलेल्या स्थानिक यशवंत स्टेडीअम येथील समेकित क्षेत्रिय कौशल्य विकास, पुनर्वसन तथा दिव्यांग सक्षमिकरण, केंद्र अर्थात सी.आर.सी.-द्वारे समुपदेशन, मार्गदर्शन सेवा ऑन-लाईन पद्धतीने देण्यात निशु:ल्क रित्या देण्यात येत आहेत.
दिव्यांग बालक तथा त्यांच्या पालकांनी ऑन-लाईन सेवांचा लाभ घेण्यासाठी, वैद्यकीय पुनर्वसन सेवांसाठी डॉ. विठल पुरी (8249709973), विशेष शिक्षणासंबंधित सेवांसाठी जगन मुडघडे (7588875899) व कविता घोडमारे (8208279744), मानसशास्त्रिय समुपदेशन तथा मार्गदर्शन सेवांसाठी अपर्णा भालेराव (8888125826), व्यावसायिक थेरपीसाठी डॉ. अश्विनी दहाट (8888859929), ऑर्थोसिस आणि प्रोथोसिससाठी डॉ.माधुरी कांबळे (8806320693), दृष्टीबाधित गतिशीलता प्रशिक्षण सेवांसाठी अस्लम खान (9027650265), दिव्यांग व्यक्तींच्या विविध योजना आणि सवलतीसाठी राजेंद्र मेश्राम (9421701280) यांचेशी कार्यालयीन वेळेत शासकीय सुट्टी वगळता सकाळी 9 ते संध्याकाळी 5;30 पर्यंत संपर्क साधावा असे आवाहन सी.आर.सी. केंद्राचे संचालक प्रफुल्ल शिंदे, यांनी केले आहे. या सर्व ऑन-लाईन पुनर्वासनात्मक सेवांचा लाभ घेण्यासाठी कोणताही शुल्क लागत नाही. सी.आर.सी., नागपूर येथिल पुनर्वसन तज्ज्ञांच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींना या सर्व सेवा ऑन-लाईन उपलब्ध आहेत. यासाठी दिव्यांग बालकांच्या पालकांचा वॉट्सअॅप ग्रुप तयार करून थेट फोनद्वारे, व्हिडिओ चॅट, लेखी सूचना आणि ऑनलाईन वेबिनर किंवा प्रशिक्षण कार्यक्रम, ऑनलाइन चर्चा सत्रे याद्वारे समुपदेशन व मार्गदर्शन करत आहेत तसेच केंद्राच्या वेबसाइट आणि फेसबुक पेजवर कोव्हिड-19 शी संबंधित उपयुक्त असलेली महत्वाची माहिती आणि विविध विषयांवरील लेख पोस्ट केले जात आहेत.
दिव्यांग बालके तथा त्यांचे पालक यांच्या मानसिक आजार होण्याच्या वाढत्या घटनेकडे, विशेषत: कोविड-19 आजाराची भीती लक्षात घेता, त्यांच्या मानसिक आरोग्याला प्रोत्साहन देण्यासाठी आणि मानसिक आजार असलेल्या व्यक्तींना दिलासा व मदत मिळावी म्हणून नागपूर आणि आमरावती क्षेत्रासाठी टोल फ्री क्रमांक 1800-599-0019 या “किरण” नावाच्या मानसिक आरोग्य हेल्पलाईनची 24 तास अविरत कार्यरत असणा-या सेवेची सुरूवात केली गेली आहे. या फ्री हेल्पलाइनद्वारा मानसिक रुग्ण व्यक्तींचा शोध, प्रथमोपचार, मानसिक समर्थन, ताण व्यवस्थापन आणि मानसिक आरोग्य, सकारात्मक वर्तनाला प्रोत्साहन, मानसिक संकट व्यवस्थापन इत्यादी सेवा प्रदान करण्यात येतात. या फ्री हेल्पलाइनचा मुख्य हेतू तणाव, चिंता, नैराश्य, घाबरलेल्या लोकांना सेवा, ताण, समायोजन विकार, अत्यंत क्लेषकारक तणाव विकार, आत्महत्येचा विचार, साथीच्या आजाराने प्रेरित मानसिक समस्या आणि मानसिक आरोग्याच्या आपत्कालीन परिस्थितीत मदत करणे हा आहे.
* * *
S.Rai/D.Wankhede/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1716300)
Visitor Counter : 172