माहिती आणि प्रसारण मंत्रालय
ऑक्सिजन एक्सप्रेस मुळे अकोला जिल्ह्यातील काही रुग्णालयात वैद्यकीय ऑक्सिजन मिळाल्यामुळे रुग्णांना दिलासा
Posted On:
29 APR 2021 1:20PM by PIB Mumbai
देशातील विविध भागात ऑक्सिजन पोहोचवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ऑक्सिजन एक्प्रेसची सेवा देशाच्या विविध भागात अविरत सुरु आहे. अकोला जिल्ह्यालाही या एक्स्प्रेसमुळे जिल्ह्यातील काही रुग्णालयात वैद्यकीय ऑक्सिजन मिळाल्यामुळे प्रशासनाला तसेच रूग्णांना दिलासा मिळाला आहे.
अकोला जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, या कठीण काळामध्ये कुठेही ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होऊ नये या उद्देशाने विशाखापट्टणम वरून नागपूरला आलेल्या ऑक्सिजन एक्सप्रेस मधील एक टॅंकर अमरावती आणि अकोला जिल्ह्याला विभागून देण्यात आला . सुमारे 10मेट्रिक टन इतका ऑक्सिजनचा हा साठा शासकीय वैद्यकीय महाविद्य रुग्णालयाला 6 मेट्रिक टन आणि उर्वरित 4 मेट्रिक टन साठ मुर्तीजापूर येथील शासकीय रुग्नालयाला देण्यात आला आहे.
या ऑक्सिजन टँकरमुळे जिल्ह्याला दिलासा मिळाला असून, गरजू रूग्णांना ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यासाठी मोठी मदत झाल्याची प्रतिक्रिया निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दूरदर्शनच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली आहे. तसेच जिल्ह्याची ऑक्सिजनची गरज पाहता पुण्यातून सुद्धा ऑक्सिजनचे टँकर मागवण्यात येत असल्याचं खडसे यांनी सांगितले.
ऑक्सिजनच्या टंचाईला दूर करण्यासाठी देशभरात चालवण्यात येत असलेल्या ऑक्सिजन एक्प्रेसमुळे अनेक रुग्णांना दिलासा मिळत आहे. उपलब्ध असलेल्या विविध मार्गानी ऑक्सिजन पोहोचवण्याचं काम केंद्र सरकारकडून सुरु आहे
***
Jaydevi PS/ST/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1714809)
Visitor Counter : 110