आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड 19 सविस्तर वृत्त

Posted On: 24 APR 2021 9:36PM by PIB Mumbai

 

ऑक्सिजन पुरवठा

  • ऑक्सिजन आणि ऑक्सिजनशी संबंधित उपकरणांचा पुरवठा  वाढवण्यासंदर्भात  उपाययोजनांबाबत पंतप्रधानांनी आज उच्चस्तरीय बैठक घेतली
  • ऑक्सिजन आणि ऑक्सिजनशी संबंधित उपकरणांवर  सीमाशुल्क आणि आरोग्य उपकर माफ. कोविडशी संबंधित लसींना मूलभूत सीमा शुल्कातून  सूट दिली जाईल
  • ऑक्सिजन एक्सप्रेसने  गेल्या 24 तासात सुमारे 150 टन ऑक्सिजन वितरीत केला
  • नागपूर येथे दोन टँकर उतरवल्यानंतर ऑक्सिजन एक्सप्रेस आज दुपारी नाशिक येथे पोहचली
  • तिसऱ्या  ऑक्सिजन एक्स्प्रेसने  आज लखनऊ येथून प्रवास सुरू केला. आणखी गाड्या लवकरच सुरु होतील.
  • भारतीय हवाई दलाने कोविड 19 मदतीसाठी आपले प्रयत्न सुरू ठेवले. रिक्त क्रायोजेनिक टाक्या आणण्यासाठी एक सी -17 मालवाहू  विमानाने सिंगापूरच्या चंगी विमानतळावर उड्डाण केले.
  • पुणे हवाईतळावरून जामनगरला रिकामे एलएमओ टँकर ट्रक पाठवण्यासाठी दुसरे सी -17 विमान तैनात केले गेले.
  • संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज संरक्षण मंत्रालय आणि तिन्ही सेवादळांद्वारें हाती घेतलेल्या कोविड मदत कार्यांचा आढावा घेतला.

 

कोविड 19 विरुद्ध लढाई

  • केंद्र सरकारने  राज्य व केंद्रशासित प्रदेशांना त्यांच्या रूग्णालयातील पायाभूत सुविधा त्वरित वाढवण्यासाठी व्यापक कृती आराखडा प्रदान केला आहे. 1 मेपासून नवीन लसीकरण धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीमध्ये ते राज्यांना मार्गदर्शन करत आहेत
  • भारतीय औषध महानियंत्रक  (डीसीजीआय) ने झायडस कॅडिलाच्या विराफीन ला सौम्य कोविड 19 लक्षणे दर्शवणार्‍या रूग्णांच्या उपचारांसाठी आपत्कालीन वापराला मर्यदित  मंजुरी दिली आहे.

 

प्रत्यक्ष कर मुदत दिलासा

  • कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज आयकर कायद्याशी संबंधित काही मुदतीमध्ये वाढ केली.
  • अतिरिक्त रकमेशिवाय प्रत्यक्ष कर विवाद से विश्वास कायदा 2020’ अंतर्गत  देय रक्कम भरण्याची मुदत 30 जून 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

 

गरीबांना दिलासा

  • मे आणि जून 2021 मध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत एनएफएसए लाभार्थ्यांनाअतिरिक्त मोफत धान्य वाटप केले जाईल.
  • राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 (एनएफएसए) अंतर्गत पुढील दोन महिन्यांसाठी म्हणजेच मे आणि जून 2021 साठी सुमारे 80 कोटी लाभार्थ्यांना दरमहा प्रति व्यक्ती 5 किलो धान्य पुरवले जाईल. (दि. 23.4.2021 रोजी बातमी प्रकाशित)

(इंग्रजी, मराठी आणि हिंदी भाषेतील  सविस्तर बातम्यांसाठी  www.pib.gov.in (दिल्ली किंवा मुंबई पाहा).

***

S.Thakur/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1713861) Visitor Counter : 92


Read this release in: English