संरक्षण मंत्रालय

कोविड-19 रुग्णांच्या उपचारासाठी वैद्यकीय ऑक्सीजन वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी  भारतीय हवाई दलाकडून रिकाम्या ऑक्सीजन कंटेनरची विमानाने वाहतूक

Posted On: 24 APR 2021 3:09PM by PIB Mumbai

 

कोविड -19 विरोधातील लढ्याचा भाग होऊन भारतीय हवाई दल, ऑक्सीजन भरून आणण्यासाठी लागणारा वेळ वाचावा आणि कोविड -19 विरोधातील लढ्याचा भाग होऊन भारतीय हवाई दल महाराष्टारील रिक्त ऑक्सीजन कंटेनर ऑक्सीजन केंद्रावर नेण्यासाठी विमानाचा वापर करत आहे.

आज 24 एप्रिल 2021 रोजी सकाळी 08:00 वाजता  हिंडन हवाई तळावरून भारतीय हवाई दलाच्या  एका सी -17 विमानाने पुणे हवाई तळाच्या दिशेने  उड्डाण केले.  सकाळी 10:00  वाजता या विमानाचे पुण्यात आगमन झाले. द्रवरूप वैद्यकीय ऑक्सीजनची वाहतूक करणारे  रिक्त कंटेनर ट्रक्स वेळेची बचत करण्यासाठी  विमानातून  नेत आहेत . हे विमान पुण्याहून सुटेल आणि हे कंटेनर आज दुपारी 1:30 वाजेपर्यंत जामनगर हवाईतळावर उतरवण्यात येतील.

भारतीय हवाई दलाने तैनात केलेल्या  आणखी एका   सी -17  विमानाने आज पहाटे 2 वाजता  सिंगापोर येथील चांगी आंतराष्ट्रीय विमानतळावर पोहोचण्यासाठी उड्डाण केले. सकाळी 07:45 वाजता या विमानाचे सिंगापोरला आगमन झाले. क्रायोजेनिक ऑक्सिजन टँकचे चार कंटेनर भरल्यानंतर  ते सिंगापोरहून उड्डाण करेल   आणि पश्चिम बंगालमधील पनागढ़ हवाईतळावर  दाखल होईल आणि संध्याकाळपर्यंत हे कंटेनर उतरविण्यात येतील.

***

Jaydevi PS/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1713757) Visitor Counter : 205


Read this release in: English