परराष्ट्र व्यवहार मंत्रालय
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी दि. 23.04.2021 पासून क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालय मुंबई अंतर्गत असलेल्या सर्व पासपोर्ट केंद्रे आणि पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रांचे कामकाज स्थगित
Posted On:
23 APR 2021 12:45PM by PIB Mumbai
"ब्रेक द चेन" उपक्रमाचा भाग म्हणून कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालय, मुंबईने दि. 23.04.2021 पासून सर्व पासपोर्ट कार्यालय केंद्रे (पीएसकेएस) आणि पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रे (पीओपीकेएस) चे कामकाज स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय महाराष्ट्र सरकार ने कोरोना संक्रमण रोखण्या च्या संदर्भात जारी केलेला आदेश क्रमांक DMU/2020/CR.92/DisM-1 दिनांक 21.04.2021 च्या नुसार आहे. या आदेशानुसार तारीख 22.04.2021 च्या रात्री 8 पासून ते 01.05.2021 च्या सकाळी 7 वाजेपर्यंत संपूर्ण राज्यात सामान्य कामांवर बंदी घालण्यात आली आहे.
क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालय मुंबई अंतर्गत असलेल्या सर्व पीएसके(PSK) आणि पीओपीएसके (POPSK) मधील सेवा आणि क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालय मुंबई येथील चौकशी काउंटर दिनांक 23.04.2021 पासून 30.04.2021 पर्यंत बंद राहतील.
सर्व अर्जदार, ज्यानी आधीच त्यांच्या भेटीची वेळ निश्चित केली आहे, त्यांना सेवा प्रदाता कंपनी टीसीएस द्वारे एसएमएस द्वारे सूचित केले जात आहे. तथापि, सर्व अर्जदारांना कळवण्यात येते की दिनांक 23.04.2021 ते 01.05.2021 पर्यंत या कार्यालयाच्या कोणत्याही पासपोर्ट सेवा केंद्रात अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. तेव्हा त्यानी कोणत्याही पीएसके / पीओपीएसके ला भेट देवु नये. अर्जदार क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालय, मुंबई या कार्यालयात दूरध्वनी द्वारे (022-26520016/17) संपर्क करू शकतात किंवा कोणत्याही माहितीसाठी आमच्या इमेल (rpo.mumbai@mea.gov.in) द्वारे आमच्याशी संपर्क शकतात. तसेच आमची वेबसाइट www.passportindia.gov.in / ट्विटर हैंडल (@rpomumbai) किंवा क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालयाच्या फ़ेसबुकपेज च्या माध्यमातून संपर्क साधू शकता.
***
Jaydevi PS/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1713544)
Visitor Counter : 291