रेल्वे मंत्रालय
ऑक्सिजन एक्स्प्रेस परिचालनासाठी रेल्वेच्या प्रयत्नांना वेग
रो-रो सेवेच्या माध्यमातून कळंबोली मालवाहतूक यार्डातून आज 7 रिकामे टँकर विशाखापट्टणम पोलाद कारखान्यात जाण्यासाठी रवाना
प्रविष्टि तिथि:
19 APR 2021 10:22PM by PIB Mumbai
मुंबई, 19 एप्रिल 2021
कोविड-19 विरुद्धच्या लढ्यामध्ये आपले योगदान म्हणून रेल्वे विभागाने ऑक्सिजन एक्स्प्रेसच्या परिचालनाच्या प्रयत्नांना वेग दिला आहे.
रेल्वेच्या मुंबई विभागीय पथकाने सपाट वाघिणींमधून प्राणवायूच्या टँकर्सची चढउतार सोपी व्हावी म्हणून कळंबोली मालवाहतूक यार्डात अहोरात्र काम करून 24 तासांच्या आत चढण बांधली आहे. रो-रो सेवेच्या माध्यमातून कळंबोली मालवाहतूक यार्डातून आज रात्री 8 वाजून 5 मिनिटांनी 7 रिकामे टँकर विशाखापट्टणम पोलाद कारखान्याच्या यार्डात जाण्यासाठी रवाना झाले आहेत. ही गाडी वसई रोड, जळगाव, नागपूर, रायपुर जं. मार्गे विशाखापट्टणमच्या पोलाद कारखान्याच्या ECoR अर्थात पूर्व तटीय रेल्वे विभागात पोहोचेल. या ठिकाणी रिकाम्या टँकर्समध्ये वैद्यकीय वापरासाठीचा द्रवरूप प्राणवायू भरला जाईल.

गेल्या वर्षीच्या टाळेबंदीच्या काळातदेखील रेल्वे विभागाने अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक सुरु ठेवून पुरवठा साखळी अबाधित राखली आणि आपत्तीकाळात देखील देशसेवेचे कार्य सुरुच ठेवले.
6GI2.jpeg)
S.Patil/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1712774)
आगंतुक पटल : 93
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English