आयुष मंत्रालय

कोरोना संकट थोपवण्यासाठी आयुष मंत्रालय प्रयत्नरत-केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक


श्रीपाद नाईक यांचा ‘चॅम्पिअन्स ऑफ चेंज’ पुरस्कारने गौरव

Posted On: 16 APR 2021 6:32PM by PIB Mumbai

पणजी, 16 एप्रिल 2021

कोरोना संक्रमणाचे संकट मोठे आहे. हे संकट थोपवण्यासाठी आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सक्रीय आहेत. त्याचबरोबर आयुष मंत्रालय आयुर्वेद आणि योग या माध्यमातून कोरोना संक्रमण थोपवण्यासाठी प्रयत्नरत असल्याचे प्रतिपादन केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) तथा संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी केले. श्रीपाद नाईक यांचा आज पावर कॉरिडॉर्स आणि पंचायत टाईम्सच्या वतीने ‘चॅम्पिअन्स ऑफ चेंज’ पुरस्काराने गौरव करण्यात आला, त्याप्रसंगी ते बोलत होते. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांची याप्रसंगी उपस्थिती होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत कोरोना संक्रमणावर यश मिळवण्यासाठी प्रयत्नरत आहे. जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम भारतात सुरु आहे, असे श्रीपाद नाईक म्हणाले. आयुष मंत्रालयही कोरोना संकटावर यश मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. आयुर्वेद आणि योगाच्या कोरोना संकटाविरोधात लढा देत आहे, असे नाईक यांनी सांगितले.

पॉवर कॉरिडोर्स आणि पंचायत टाईम्सने आयोजित केलेल्या ‘चॅम्पिअन्स ऑफ चेंज’ पुरस्काराने मनोरंजन, सामाजिक, उद्योग क्षेत्रातील धुरीणांना गौरवण्यात आले.

S.Thakur/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1712295) Visitor Counter : 106