माहिती आणि प्रसारण मंत्रालय
जालियनवाला बाग नरसंहाराच्या 102 व्या स्मृतीदिनानिमित्त फिल्म्स डिव्हिजन करणार लघुपटांचे प्रसारण
Posted On:
12 APR 2021 3:51PM by PIB Mumbai
दिनांक 13 एप्रिल 2021 रोजी, जालियनवाला बाग हत्याकांडाच्या 102 व्या स्मृतीदिनानिमित्त, फिल्म्स डिव्हिजन, या हत्याकांडातील हुतात्म्यांना श्रद्धांजली म्हणून तीन माहितीपर लघुपट दाखवणार आहे. हे चित्रपट आहेतः जालियन वाला बाग हा लघुचित्रपट (18 मिनिटे / प्रेम प्रकाश / इंग्रजी / 1970 ), हा नरसंहार भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासामध्ये एक निर्णायक टप्पा कसा ठरला ते दाखवितो,'जालियनवाला बाग चे नायक - डॉ. सैफुद्दीन किचलू' ,(27 मिनिटे / एस. आझाद) / हिंदी / 2011), हा जालियनवाला बाग येथील सभेचे आयोजक डॉ. सैफुद्दीन किचलू यांच्या चरीत्रावर आधारीत लघुपट, डॉ. एस किचलू आणि '13 04 1919'(12, मिनिटे/ अमृत पाल सिंह / हिंदी / 2019) हा ब्रिटिश सैन्याने जालीयनवाला बाग येथे निष्पाप लोकांच्या केलेल्या भयानक नरसंहारावर आणि या हत्याकांडाच्या दुदैवी प्रसंगाच्या स्मरणार्थ बांधल्या गेलेल्या, स्मारकावर आधारीत लघुपट .
AA5Y.jpeg)
T1WD.jpeg)
NYLI.jpeg)
दिनांक 13 एप्रिल 2021 रोजी https://filmsdivision.org/ @ “डॉक्यूमेंटरी ऑफ द वीक” आणि https://www.youtube.com/user/FilmsDivision या संकेतस्थळांवर 24 तास हे लघुपट प्रदर्शित केले जाणार आहेत.
***
Jaydevi PS/S.Patgoankar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1711150)
Visitor Counter : 205