रेल्वे मंत्रालय

फलटण आणि पुणे यांच्या दरम्यान शटल रेल्वे सेवा सुरु

Posted On: 30 MAR 2021 5:30PM by PIB Mumbai

मुंबई/पुणे, 30 मार्च20201

 

फलटण आणि पुणे यांच्या दरम्यान डायरेक्ट रेल्वे सेवेला आज केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला.

फलटण आणि पुण्याला लोणंद मार्गे जोडणाऱ्या ट्रेनमुळे विद्यार्थी, ऊस शेतकरी, कर्मचारी आणि व्यापारी यांना लाभ होईल. केंद्रीय अर्थसंकल्पामधील महाराष्ट्रासाठी रेल्वेचे बजेट 2009-14 च्या 1171 कोटीच्या तुलनेत आता सरासरी 7107 कोटी झाले आहे. फलटण हे ऊस उत्पादन, भाज्या आणि साखर आधारित उद्योग यासाठी प्रसिद्ध आहे. तसेच ते डाळिंब, भेंडी आणि सिमला मिरचीच्या उत्पादनासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. ही ट्रेन आठवड्यातून सहा दिवस चालेल. फलटण होऊन सकाळी निघून ती पुण्याला पोहोचेल.

उद्घाटन प्रसंगी श्री प्रकाश जावडेकर म्हणाले की माझ्या विद्यार्थिदशेपासून प्रलंबित असलेली फलटण आणि पुणे यांच्या दरम्यान डायरेक्ट ट्रेन सेवेची मागणी पूर्ण झाली याचा मला आनंद होत आहे गेल्या सात वर्षांमध्ये रेल्वेचे डबे, रेल्वे स्टेशन आणि रेल्वे मार्ग यांच्या स्वच्छतेमध्ये आमूलाग्र बदल दिसून येत आहे. बायो टॉयलेट वर भर दिल्यामुळे रेल्वे बरोबरच रेल्वे मार्ग देखील स्वच्छ झाले आहेत.

श्री जावडेकर पुढे म्हणाले की IRCTC द्वारे रेल्वे तिकिटाचे बुकिंग आणि रद्द झालेल्या तिकिटाचा परतावा मिळवणे आता सोपे झाले आहे. तसेच मानव रहित रेल्वे क्रॉसिंग वर होणाऱ्या दुर्घटना पूर्णपणे थांबलेल्या आहेत, कारण मानव रहित रेल्वे क्रॉसिंग ऐवजी आपण आता पर्यायी व्यवस्था देणे सुरू केले आहे.  

केंद्रीय मंत्री पुढे म्हणाले की महाराष्ट्रातून पहिली किसान रेल्वे सुरू करण्यात आली होती आणि आता शंभरावी किसान रेल्वे देखील महाराष्ट्रातूनच सुरु करण्यात आली आहे. तसेच रेल्वेने 5000 रेल्वे स्टेशनवर वाय फाय ची सुविधा दिली आहे

68% रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण पुर्ण झालेले आहे. बंदरांना रेल्वेमार्गाशी जोडणे तसेच रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण करणे या गोष्टीसुद्धा वेगाने सुरू आहेत. पॅसेंजर रेल्वे च्या गतीने होत असलेला भारतीय रेल्वेचा विकास आता राजधानी रेल्वेच्या वेगाने होत आहे.

व्हर्चुअल पद्धतीने झालेल्या या उद्घाटनाला खासदार गिरीश बापट, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, राज्‍यातील इतर मान्यवर नेते आणि रेल्‍वे मंत्रालयातील वरिष्‍ठ अधिकारी उपस्थित होते.

या नवीन सेवेबाबचा A short video 

 

वेळापत्रक

31 मार्च पासून नियमितपणे सुरू होणारी सेवा खालीलप्रमाणे असेल

01435 DEMU पुण्याहून सकाळी 5.50 ला निघून लोणंद ला 7.50 ला पोहोचेल 8.00 वाजता लोणंदहून निघून सकाळी 9.35 वाजता फलटण ला पोहोचेल.  

01434 सकाळी 11.00 वाजता फलटण हून निघेल आणि दुपारी 12.20 ला लोणंद ला पोहोचेल.

01433 दुपारी 3.00 वाजता लोणंद हून निघेल आणि 4.20 वाजता फलटण ला पोहोचेल

01436 संध्याकाळी 6.00 वाजता फलटण हून निघेल आणि संध्याकाळी 7.10 वाजता लोणंद ला पोहोचेल. 7.20 ला लोणंद हून निघून पुण्यात रात्री 9.35 ला पोहोचेल.

 

* * *

RT/MC/DR

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1708514) Visitor Counter : 216


Read this release in: English