अन्न प्रक्रिया उदयोग मंत्रालय
गोव्यातल्या फळांवरील प्रक्रीया आणि मूल्यवर्धनाविषयी मार्गदर्शन करण्यासाठी तीन दिवसीय क्षमता बांधणी कार्यक्रम
Posted On:
26 MAR 2021 8:55PM by PIB Mumbai
पणजी, 26 मार्च 2021
गोव्यातील फळांवर प्रक्रिया करून, त्यांचे मूल्यवर्धन करण्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी आयसीएआर-कृषी विज्ञान केंद्र, उत्तर गोवा, आयसीएआर- सीसीएआरआय गोवा यांनी सालीगामं येथील गोवा जैवविविधता मंडळाच्या सहकार्याने एक तीन दिवसीय क्षमता बांधणी कार्यक्रम केला होता. गोव्यातील सांकली, हर्वेली आणि पाली या गावातील 25 जणांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता.या कार्यक्रमाची सांगता, 24 मार्च रोजी, गोव्याच्या अन्न महासंघाच्या अध्यक्षा सुलक्षणा सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिला बचत गटांनी फणस प्रक्रिया उद्योग सुरु करावा अशी सूचना त्यांनी केली. केंद्र सरकारच्या अन्न प्रक्रिया मंत्रालयाच्या ‘एक जिल्हा-एक उत्पादन’ उपक्रमाअंतर्गत, उत्तर गोवा जिल्ह्यासाठी फणस या फळाची निवड करण्यात आली आहे.

आयसीएआर- सीसीएआरआय चे संचालक डॉ ई.बी. चाकूरकर हे ही या कार्यक्रमात सहभागी झाले होते. असा उपयुक्त मागर्दर्शक कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल त्यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले. आयसीएआर-केव्हीके चे मुख्य वैज्ञानिक आणि प्रमुख डॉ बी. एल. काशिनाथ यांनी उपस्थितांचे स्वागत करत केव्हीके च्या उपक्रमांची माहिती दिली. तर सुनेत्रा तालुकिकर यांनी या तीन दिवसीय कार्यक्रमाची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. श्री प्रभू यांनी उपस्थितांचे आभार मानले.


M.Chopade/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1707957)
Visitor Counter : 119