माहिती आणि प्रसारण मंत्रालय
‘रंगभूमी: भारतीय रंगभूमीचा सोहळा’ जागतिक रंगभूमी दिनानिमित्त, फिल्म्स प्रभागाचा अनोखा महोत्सव
Posted On:
26 MAR 2021 7:32PM by PIB Mumbai
मुंबई, 26 मार्च 2021
जागतिक रंगभूमी दिनाच्या निमित्ताने (27 मार्च) फिल्म्स प्रभागच्या वतीने दोन दिवसांच्या चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले आहे. यात देशाच्या विविध भागात भारतीय नाट्यपरंपरा आणि त्यासंदर्भात होत असलेल्या प्रयोगांवर आधारीत चित्रपट दाखवले जाणार आहेत. येत्या 27 आणि 28 मार्च 2021 रोजी, 48 तास पुढिल संकेतस्थळावर हे चित्रपट दाखवले जाणार आहेत.https://www.youtube.com//FilmsDivision
मानवी इतिहासातील सर्वात प्राचीन कला प्रकाराचे महत्त्व विषद करण्यासाठी आणि त्याची लोकप्रियता वाढवण्यासाठी 27 मार्च रोजी जागतिक रंगभूमी दिन साजरा केला जातो. मानवी भावनांशी जवळचे नाते असल्याने, विचारांवर प्रभाव पाडण्याची आणि समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याची क्षमता रंगभूमीत आहे. भारतीय रंगभूमीचा इतिहास पाच हजार वर्षांपेक्षा प्राचीन आहे. त्याने बऱ्याच रंगमंच कला प्रकारांना जन्म दिला असून देशातील सांस्कृतिक वारसा समृद्ध करणारे कैक प्रतिभावान कलाकार निर्माण केले आहेत.
फिल्म्स प्रभाग, भारतीय कला आणि संस्कृतीचा प्रचार-प्रचार आणि त्यांना लोकप्रियता मिळवून देण्यासाठी अग्रेसर आहे. पारंपारिक आणि आधुनिक अशा दोन्ही नाट्य कला प्रकारांवर फिल्म प्रभागने संशोधन करुन अनेक दर्जेदार माहितीपट तयार केले आहेत. प्रभागने जागतिक रंगभूमी दिन 2021 साजरा करण्यासाठी पुढाकार घेतला असून, रंगमचंकला आणि आधुनिक भारतीय रंगभूमीसंबंधित महत्वाच्या घटकांवर लक्ष केंद्रित करून हे चित्रपट तयार केले आहेत. 27 आणि 28 मार्च रोजी फिल्म प्रभागचे संकेतस्थळ आणि यू ट्यूब वाहिनीवर हे चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत.
रंगभूमी: (सेलिब्रेशन ऑफ इंडियन थिएटर) भारतीय रंगभूमीचा सोहळा या दोन दिवसांच्या चित्रपट महोत्सवात, पुढील चित्रपट दाखवले जाणार आहेत -
इंडियन थिएटर (101 मिनिटे/ इंग्लिश/1988, जब्बार पटेल) - भारतातील विविध भागातील रंगमंच कलांचा त्यासंबंधित प्रयोगांचा आणि प्रख्यात कलावंतानी केलेल्या कामाचा मागोवा यात घेतला आहे. यासंदर्भात मौलिक काम करण्यात आले आहे.
वी, द थिएटर (आम्ही रंगभूमी) (54 मिनिटे/मराठी/2011/अजित भूरे) -मराठी रंगभूमी, त्याचा विकास आणि त्यात काळानुरुप होत गेलेले बदल याच्या विविध पैलूंचा धांडोळा या चित्रपटात घेतला आहे.बाबा, बी व्ही कारंथ(93 मिनिटे/कन्नड आणि हिंदी/2012/रामचंद्र पी एन) - बहुमुखी प्रतिभेचे धनी असलेल्या नाट्य कलावंत, त्यांचे कार्य आणि जीवनावर आधारित. नटवर्य भालचंद्र पेंढारकर (50 मिनिटे/मराठी/2019/विरेन्द्र प्रधान) - ज्येष्ठ मराठी नाट्य अभिनेते, गायक, निर्माते भालचंद्र पेंढारकर यांच्यावरील चरित्रपट. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (17 मिनिटे/इंग्लीश/1984/ जी आर ठाकूर) –प्रतिष्ठीत राष्ट्रीय नाट्य संस्थेची गोष्ट सांगणारा लघुपट.भारत आणि रंगभूमी (80 मिनिटे/ हिन्दी/2013/कमल स्वरुप) - भारतीय चित्रपटाचे उद्गाते दादासाहेब फाळके त्यांच्या शेवटच्या काळात वाराणसीत, आत्मचरित्रात्मक नाटक रंगभूमी लिहीत होते. त्याचा सर्वंकष वेध या चित्रपटात घेतला आहे. ध्वनी, दृश्य्, भूमिका यांचा विविधांगी थक्क करणारा पटच यात मांडला आहे.
M.Chopade/V.Ghode/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1707930)
Visitor Counter : 269