संरक्षण मंत्रालय
पुणे येथील पॅराप्लेजिक रिहाबिलिटेशन सेंटर आणि क्वीन्स मेरी टेक्नीकल इन्स्टिट्यूटला दक्षिण कमांडच्या आर्मी कमांडरांची भेट
Posted On:
25 MAR 2021 6:05PM by PIB Mumbai
लष्कराच्या दक्षिण कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन चीफ लेफ्टनंट जनरल जे. एस. नैन, दक्षिण कमांड आर्मी वाईव्ह्ज वेल्फेअर असोसिएशनच्या क्षेत्रीय अध्यक्ष श्रीमती अनिता नैन यांनी 24 मार्च 2021 रोजी पॅराप्लेजिक रिहाबिलिटेशन सेंटर (पीआरसी) आणि क्विन मेरीज तंत्रज्ञान संस्थेला (क्यूएमटीआय) भेट दिली. शारीरिकदृष्ट्या दिव्यांग सैनिकांचे पुनर्वसन आणि त्यांना समाजात पुन्हा प्रवाहित करण्यासाठी या दोन्ही संस्थांकडून होत असलेले प्रयत्न त्यांनी जाणून घेतले.
पीआरसी मध्ये लेफ़्ट. जनरल नैन आणि त्यांच्या पत्नी यांनी आंतराष्ट्रीय पक्षाघात क्रीडापटू आणि दोन्ही हात आणि पायांना पक्षाघात झालेले सैनिक यांच्याशी संवाद साधला.
या ठिकाणी असलेले 'उड चलो' सेंटर, व्यावसायिक प्रशिक्षण कार्यशाळा, जलचिकित्सेसह जलतरण तलाव, बंदिस्त क्रीडा संकुल, माऊथ पेंटिंग केंद्र या माध्यमातून पुनर्वसन प्रक्रियेदरम्यान जवानांना प्रेरित करण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली.
क्वीन मेरीज तंत्रज्ञान संस्था (क्यूएमटीआय) येथे त्यांनी शारीरिकरित्या दिव्यांग सैनिकांना देण्यात येणाऱ्या व्यावसायिक आणि मृदू कौशल्य प्रशिक्षणाचा आढावा घेतला. माहिती तंत्रज्ञानासह हार्डवेअर, सॉफ्टवेअर, नेटवर्किंग हे विविध पुनर्वसन अभ्यासक्रम त्याचप्रमाणे इलेक्ट्रिशियन, फिटर, ऑटोमोटिव्ह रिपेयर मेकॅनिक इत्यादीं प्रशिक्षण देण्याच्या सोयी सुविधा असलेल्या विभागांना त्यांनी भेट दिली आणि संवाद साधत ,क्वीन मेरीज तंत्रज्ञान संस्थेत प्रशिक्षण घेताना दिव्यांगांकडून होत असलेल्या प्रयत्नांचे आणि कर्मचाऱ्यांची प्रशंसा केली.
लेफ्टनंट जनरल जे. एस. नैन यांनी व्यावसायिक, आणि उद्योजकीय कौशल्ये देऊन दिव्यांग सैनिकांचे सक्षमीकरण करण्याच्या दिशेने या दोन्ही संस्था करीत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. ज्यायोगे त्यांचे पुनर्वसन तसेच सैनिकांचे खरे व्यक्तिमत्व आणि लढाऊ वृत्ती प्रतिबिंबित होऊन समाजात सकारात्मकरित्या योगदान देण्याच्या त्यांच्या परिवर्तनाला सुरुवात होते.
***
M.Iyengar/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1707578)
Visitor Counter : 202