माहिती आणि प्रसारण मंत्रालय

जागतिक जल दिनी फिल्म्स डिव्हिजन आणि चिल्ड्रेन्स फिल्म सोसायटी, इंडिया संयुक्तरित्या सादर करणार चित्रपटांचे विशेष पॅकेज


‘पाण्याचे मूल्यमापन’- जागतिक जल दिन 2021 ची संकल्पना

सर्व चित्रपटांचा आनंद घ्या फिल्म्स डिव्हिजनच्या यू ट्यूब चॅनेल वर

Posted On: 21 MAR 2021 9:35PM by PIB Mumbai

मुंबई, 21 मार्च 2021

 

जल संवर्धनाचे महत्त्व सांगण्यासाठी आणि जागतिक जलसंकटाबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 22 मार्च रोजी जागतिक जल दिन साजरा केला जातो. या दिवसाचे महत्व अधोरेखित करण्यासाठी उद्या 22 मार्च 2021 रोजी फिल्म्स डिव्हिजन आणि चिल्ड्रेन्स फिल्म सोसायटी, इंडिया संयुक्तरित्या चित्रपटांचे विशेष पॅकेज त्यांच्या संकेतस्थळावर आणि युट्यूब चॅनेल https://www.youtube.com/FilmsDivision वर दाखवणार आहे.

‘पाण्याचे मूल्यमापन’ ही जागतिक जल दिन 2021 ची संकल्पना आहे. जगाच्या अस्तित्वासाठी पाण्याचे मूल्य प्रचंड आणि ठाव लागणार नाही असे असल्याची चर्चा आज असली तरी पाण्याचे मूल्य त्यापेक्षा कैकपटीने अधिक आहे. फिल्म्स डिव्हिजन आणि चिल्ड्रेन्स फिल्म सोसायटी देखील चित्रपटातून हाच संदेश प्रतिबिंबित करतात.

प्रदर्शित होणारे चित्रपटः रेन मॅन (इंग्रजी / 2019/13 मि / विप्लॉव राय भाटिया) - पावसाचे पाणी कसे वाचवायचे यावर आधारित चित्रपट. या चित्रपटामध्ये छतावर पडणारे पावसाचे पाणी साठवण्याची शिफारस करणाऱ्या आणि "रेन मॅन" म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रख्यात वैज्ञानिक डॉ. शिवकुमार यांच्या कार्यावर प्रकाश टाकला गेला आहे. 

जोहड - पाण्याचे स्त्रोत (हिंदी / 1999 / 10 मिनिट / स्वदेश पाठक) जोहड चित्रित करतात - राजस्थानातील एक पारंपरिक जलसंचयनाची पद्धत ज्याद्वारे सिंचनासाठी, पिण्यासाठी आणि इतर घरगुती वापरासाठी पाणी पुरविले जाते आणि पाण्याच्या वाढत्या उपलब्धतेमुळे अन्नधान्य, दूध यासारखी जैव वस्तुमान उत्पादकता वाढते.

पाणी, जमीन आणि जनता (इंग्रजी / 2004/ 9 मि / मोहि उद्दीन मिर्झा) भारतातील सद्यस्थितीवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करते आणि यात जमीन, पाणी आणि लोक यांच्यामुळे एकत्रितरित्या उद्भवणाऱ्या पाणीटंचाईच्या भयावह प्रवृत्तीचा प्रतिकार करण्याचे उपाय आहेत.

पाणी - रे - पाणी (इंग्रजी / 2006/10 मिनिट / उर्मी चक्रवर्ती) या चित्रपटातून पृथ्वीवरील जीवन टिकवण्यासाठी पाणी सर्वात आवश्यक असून पाण्याच्या समस्येवर केवळ सरकारी यंत्रणांचीच नव्हे तर सर्वसामान्यांच्याही चाणाक्ष देखरेखीची आवश्यकता आहे हा संदेश दिला आहे.

वेरासिटी (हिंदी / 2020 / 4 मिनिट / स्वदेश पाठक) हा सॅण्ड अ‍ॅनिमेशन चित्रपट आहे जो आपल्या छतावरील सोप्या प्रणालीद्वारे वर्षासंचयन कसे करायचे ते उलगडून दाखवतो. "रूफ टॉप रेन वॉटर हार्वेस्टिंग" नावाची प्रणाली म्हणजे टाकीमध्ये पावसाचे पाणी साठवून ठेवणे जे वर्षभर पेयजल म्हणून उपयुक्त असेल आणि अतिरिक्त पाणी जमिनीत मुरून भूजल पातळी पुन्हा वाढवते.

चिल्ड्रन्स फिल्म सोसायटी, इंडिया चे दोन चित्रपट - वॉटर सो प्रेशिअस (ए. के. बीर / 12 मिनिटे / हिंदी / 2000) आणि पानी रे पानी (साई परांजपे / 13 मिनिटे / हिंदी / 2004) देखील या पॅकेजचा भाग आहेत. हे चित्रपट मुलांच्या नजरेतून पर्यावरणाची काळजी व्यक्त करतात.

‘डॉक्युमेंटरी ऑफ द वीक’ विभागाअंतर्गत Https://filmsdivision.org वर आणि यूट्यूब चॅनेलवर म्हणजेच https://www.youtube.com/FilmsDivision वर चित्रपट प्रदर्शित केले जातील.

 

* * *

M.Chopade/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1706484) Visitor Counter : 137


Read this release in: English