संरक्षण मंत्रालय
आयएनएचएस अश्विनी इथे सैनिकी नर्सिंग सेवेत 40 कॅडेट रुजू
Posted On:
19 MAR 2021 5:53PM by PIB Mumbai
कॉलेज ऑफ नर्सिंगच्या बेसिक बीएससी नर्सिंग कॅडेट्सच्या सातव्या तुकडीचा कमिशनिंग सोहळा, 18 Mar मार्च 21 रोजी आयएनएचएस अश्विनी, मुंबई इथे आयोजित करण्यात आला. 40 नर्सिंग कॅडेट्सचे चार वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर सैनिकी नर्सिंग सेवेमधे (एमएनएस) मध्ये त्यांची नेमणूक करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सर्जन रियर एडमिरल आर्ती सरीन, कमांडिंग ऑफिसर आयएनएचएस अश्विनी यांनी नव्याने नियुक्त झालेल्या नर्सिंग अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला.
लेफ्टनंट चस्कित एंग्मो यांना 'डीजीएमएस रोलिंग ट्रॉफी' आणि 'पुष्पा मलिक चषक'' देण्यात आला. 86.66% गुण मिळवत त्यांनी अव्वल स्थान पटकवले. लेफ्टनंट अलीना डेव्हिस यांना बॅचच्या सर्वोत्कृष्ट अष्टपैलू नर्सिंग कॅडेटसाठी 'अश्विनी क्रेस्ट' मिळाला आणि लेफ्टनंट कीर्ती शुक्ला यांना बेडसाइड नर्सिंग कॅडेटसाठी 'श्रीमती पद्मा कृष्णा रोलिंग ट्रॉफी' देण्यात आली. ब्रिग ओमाना कुरियाकोसे, प्रिन्सिपल मॅट्रॉन, युनिटचे सर्वात वरिष्ठ नर्सिंग अधिकारी यांनी नव्याने नियुक्त झालेल्या नर्सिंग अधिका-यांना कर्तव्याची प्रतिज्ञा दिली.
कॉलेज ऑफ नर्सिंगची स्थापना 2010 साली झाली. ही संस्था महाराष्ट्र आरोग्य विज्ञान, नाशिक विद्यापीठाशी संलग्न आहे. इथे पाच वर्षांच्या नर्सिंग अभ्यासक्रमात चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम आणि एक वर्षाचा पदव्यूत्तर पदविका अभ्यासक्रम उपलब्ध आहे.
Jaydevi PS/V.Ghode/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1706107)
Visitor Counter : 82