सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय

सी.आर.सी. नागपूरद्वारे दिव्यांग व्यक्तींसाठीचा ‘युवा टॅलेंट फेस्टिव्हल’ उत्साहात साजरा

Posted On: 14 MAR 2021 6:52PM by PIB Mumbai

नागपूर, 14 मार्च 2021

दिव्यांग व्यक्तींच्या सांस्कृतिक क्षेत्रातील सहभाग तसेच त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाच्या अधीन असलेल्या स्थानिक यशवंत स्टेडीअम येथील  समेकित क्षेत्रिय कौशल्य विकास, पुनर्वसन तथा दिव्यांग सक्षमिकरण, केंद्र अर्थात सी.आर.सी.-नागपूरच्या मानसशास्त्र विभागाद्वारे दिव्यांग युवकांसाठी ‘युवा टॅलेंट फेस्टिव्हलचे’ आयोजन  व्हर्च्युअल पद्धतीने करण्यात आले होते. यावेळी विशेष अतिथी म्हणून सी.आर.सी. केंद्राचे संचालक  प्रफुल्ल शिंदे ऑन-लाईन पद्धतीने उपस्थित होते.

सी.आर.सी. नागपुर केन्द्राद्वारा आयोजित ‘युवा टॅलेंट फेस्टिव्हल’ मध्ये नृत्य स्पर्धेसाठी शायरी मेघे, कुणाल बाडकर, पार्थ खांडकबन, पोल राजू यांना, गायन कोमल मेश्राम, प्रवीण मिश्रा, कुणाल बाडकर, अबोली जरित यांना, आणि ड्रॉइंग स्पर्धेसाठी दीपेश पार्सेकर, सुधीर मुरगडे, हर्षिनी, अश्वती के.एम्. यांना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. तसेच सर्व सहभागी दिव्यांग युवकांना प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली.

कार्यक्रमातील उपस्थित दिव्यांग युवकांना मार्गदर्शन करतांना सी.आर.सी. केंद्राचे संचालक श्री. प्रफुल्ल शिंदे यांनी युवकांच्या उत्स्फुत सहभागाबद्दल आणि त्यांनी सादर केलेल्या विविध कलांबद्दल अभिनंदन केले आणि अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन सी.आर.सी. नागपुर केन्द्राद्वारा वेळोवेळी करण्यात येईल, असे आश्वासन दिले. ऑन-लाईन पद्धतीने आयोजित ‘युवा टॅलेंट फेस्टिव्हल’ मध्ये एकूण 25 दिव्यांग युवक-युवतींनी उत्स्फृत सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक  मानसशास्त्र विभागाच्या प्रमुख  अपर्णा भालेराव-पिंपळकर यांनी तर आभार डॉ. अश्विनी दहाट यांनी मानले, कार्यक्रमाचे सूत्र संचालन स्वत: दिव्यांग असलेला हरीश प्रजापती  यांनी केले तर कविता गोडमारे, माधुरी कांबळे यांनी स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून कार्य केले.

 

S.Rai/D.Wankhede/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1704726) Visitor Counter : 219