संरक्षण मंत्रालय
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते शववाहिनी आणि कचरा उचलण्यासाठीच्या वाहनांचे ग्रामपंचायतींना हस्तांतरण
Posted On:
13 MAR 2021 1:39PM by PIB Mumbai
पणजी, 13 मार्च 2021
केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते आज विविध ग्रामपंचायतींना शववाहिनी आणि कचरा उचलण्यासाठीच्या वाहनांचे हस्तांतरण करण्यात आले. विधानभवन परिसरात झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांची विशेष उपस्थिती होती.
श्रीपाद नाईक यांच्या हस्ते खासदारनिधीतून 45 लाख रुपये खर्चाने ही वाहने ग्रामपंचायतींना देण्यात आली. कोलवाळ, ताळगाव, विरोन्दा, सुकूर पंचायतींना शववाहिनी तर पाळी, कुतूम्बी, कुडणे ग्रामपंचायतींना कचरा उचलण्यासाठी लागणाऱ्या वाहनांचे हस्तांतरण करण्यात आले.
खासदारनिधीचा वापर ग्रामपंचायतींच्या विकासासाठी होत असल्याचा विशेष आनंद आहे, असे श्रीपाद नाईक म्हणाले. या वाहनांमुळे पंचायतींना मोठी मदत होईल.
मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी श्रीपाद नाईक यांनी खासदारनिधीतून केलेल्या कामाचे कौतुक केले. गेल्या 20 वर्षात नाईक यांनी खासदारनिधीचा केलेला वापर हे सर्वांसमोर अनोखे उदाहरण असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
***
S.Thakur/CY
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1704557)
Visitor Counter : 202