संरक्षण मंत्रालय
समुद्रात बंद पडलेल्या जहाजाला भारतीय नौदलाकडून तंत्रविषयक सहाय्य
Posted On:
12 MAR 2021 7:48PM by PIB Mumbai
मुंबई, 12 मार्च 2021
ओमानच्या आखातात असलेल्या आयएनएस तलवार या जहाजाला 11 मार्च 2021 ला एमव्ही नयन या समुद्रात बंद पडलेल्या व्यापारी मालवाहू जहाजाकडून तांत्रिक सहाय्यासाठी मदतीची विनंती आली. ओमानहून इराककडे निघालेले हे जहाज उर्जा निर्मिती यंत्रणेसह आणखी काही यंत्रणात बिघाड झाल्याने 9 मार्च पासून समुद्रावर तरंगत होते.

एमव्ही नयन संकटात असल्या संदर्भात प्राथमिक हवाई पाहणी केल्या नंतर भारतीय नौदल जहाजाने, व्हीबीएसएस पथकासह (स्थळाला भेट, शोध आणि ताब्यात घेणाऱ्या) तांत्रिक सहाय्य करणारे पथकही मदतीसाठी पाठवले. एमव्ही नयन या जहाजावर सात भारतीय कर्मचारी होते.नौदलाच्या पथकाने सात तास अखंड काम करत जनरेटर, समुद्री जल पंप, कॉम्प्रेसर, मुख्य इंजिन यासारखी उपकरणे कार्यान्वित करत हे जहाज प्रवासासाठी पुन्हा सज्ज केले.

एमव्ही नयन पुढच्या बंदराकडे प्रयाण करण्यापूर्वी जीपीएस आणि नेव्हिगेशन लाईट यासारखी उपकरणे कार्यान्वित करण्यासाठीही नौदलाच्या पथकाने सहाय्य केले.

* * *
Jaydevi PS/N.Chitale/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1704456)
Visitor Counter : 162