आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

महाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक, गुजरात आणि तामिळनाडूमध्ये दैनंदिन रुग्ण संख्येत वाढ सुरूच

भारताच्या सक्रीय रुग्णांपैकी 71.69% महाराष्ट्र आणि केरळ मध्ये

देशातल्या ज्या राज्ये/केंद्र शासित प्रदेशात कोविड-19 रुग्णांची वाढ होत आहे अशा ठिकाणच्या परिस्थितीवर केंद्राचे बारकाईने लक्ष

देशभरात 2.61 कोटी हून अधिक कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रा देण्यात आल्या

Posted On: 12 MAR 2021 4:40PM by PIB Mumbai

देशात काही राज्यात दैनंदिन कोविडचे नवे रुग्ण मोठ्या संख्येने  आढळत आहेत. महाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक, गुजरात आणि तामिळनाडूमध्ये दैनंदिन रुग्ण संख्येत वाढ सुरूच आहे. गेल्या 24 तासात नोंदवल्या गेलेल्या नव्या रुग्णांपैकी 85.6% रुग्ण या राज्यांमधले आहेत.

 

गेल्या 24 तासात 23,285 नव्या रुग्णांची नोंद झाली महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे 14,317 (दैनंदिन नव्या रुग्णांच्या 61.48%) नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर केरळ 2,133 तर  पंजाबमध्ये  1,305 नव्यारुग्णांची नोंद झाली.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001FWJX.jpg

नव्या रुग्ण संख्येत आठ राज्यांचा आलेख चढता आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image002A998.jpg

 

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image003GYN1.jpg

भारतातली  एकूण सक्रीय रुग्ण संख्या आज 1,97,237 आहे.

 

भारताची सध्याची सक्रीय रुग्ण संख्या ही भारताच्या एकूण पॉझीटीव्ह रुग्णसंख्येच्या 1.74%  आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image004KX7T.jpg

देशाच्या एकूण सक्रीय रुग्ण संख्येपैकी 82.96% पाच राज्यात आहे. भारताच्या एकूण सक्रीय रुग्ण संख्येपैकी  71.69% महाराष्ट्र आणि केरळ या दोन राज्यात आहे.

 

केंद्र सरकार सर्व राज्ये/केंद्र शासित प्रदेशांच्या विशेषतः ज्या राज्यात सक्रीय रुग्ण मोठ्या संख्येने असून दैनंदिन नव्या रुग्ण संख्येतही वाढ दिसत आहे अशा राज्यांच्या संपर्कात आहे. त्यांच्या समवेत कोविड प्रतिबंधक आणि सार्वजनिक आरोग्य उपाय योजनांच्या स्थितीचा नियमित आढावा केंद्र सरकार घेत आहे. महाराष्ट्र आणि पंजाब या राज्यात कोविड रुग्ण संख्येतली वाढ लक्षात घेऊन कोविड-19 नियंत्रण आणि प्रतिबंधक उपाय योजनांसाठी या राज्यांना मदत करण्यासाठी केंद्राने उच्च स्तरीय आरोग्य पथके नुकतीच पाठवली आहेत. केंद्राने याआधी महाराष्ट्र, केरळ, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात, पंजाब, कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि जम्मू-काश्मीर मध्ये कोरोना रुग्णांची वाढ पाहून कोरोना विरोधातल्या लढ्यात सहाय्य करण्यासाठी केंद्र सरकारने उच्च स्तरीय पथके नियुक्त केली आहेत.केंद्रीय पथकांचे अहवाल पुढील कार्यवाही साठी या राज्यांनाही देण्यात आले आहेत. राज्याकडून उचलल्या जाणाऱ्या पावलावर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची देखरेख आहे.  

 

आज सकाळी सात वाजता प्राप्त झालेल्या अहवालानुसार  आतापर्यंत  2.61 कोटी पेक्षा जास्त म्हणजे (2,61,64,920) लसीच्या मात्रा 4,87,919 सत्राद्वारे देण्यात आल्या.

 

यामध्ये 72,23,071 आरोग्य कर्मचारी ( पहिली मात्रा ), 40,56,285 आरोग्य कर्मचारी (दुसरी मात्रा ), 71,21,124 फ्रंट लाईन कर्मचारी ( पहिली मात्रा ),6,72,794 फ्रंट लाईन कर्मचारी(दुसरी मात्रा ), 10,30,612 जण 45 पेक्षा जास्त वय असलेल्या आणि सहव्याधी  असलेले ( पहिली मात्रा ), आणि  60 वर्षावरील 60,61,034 लाभार्थी   यांचा समावेश आहे.

 

लसीकरण अभियानाच्या 55 व्या दिवशी (11 मार्च   2021) ला  4,80,740  लसीकरण मात्रा देण्यात आल्या. यामध्ये 4,02,138 लाभार्थींना पहिली मात्रा ( आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाईन कर्मचारी ) आणि 78,602 आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाईन कर्मचाऱ्यांना लसीची दुसरी मात्रा  देण्यात आली.

 

काल बहुतांश राज्यात महाशिवरात्र साजरी करण्यात आली. अनेक लोकांनी विशेषतः आशा सेविका, सहाय्यक, लस देणाऱ्या अशा महिलांचा उपवास होता. त्यामुळे कोविड लसीकरण आकडे काहीसे कमी राहिले.  

 

आतापर्यंत 1.09 Cr (1,09,53,303)  जण कोविडमधुन बरे झाले. गेल्या 24 तासात 15,157  रुग्ण बरे होऊन घरी परतले.

 

खालील आलेख 10 फेब्रुवारी 2021 ते 12 मार्च 2021      या काळात सक्रीय रुग्ण संख्या आणि बरे झालेल्यांची संख्या  यांचा कल दर्शवतो.बरे झालेल्यांची संख्या आणि सक्रीय रुग्ण संख्या यांच्यातले अंतर सातत्याने वाढत असून हे आज 1,07,56,066 होते.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image005GVSV.jpg

गेल्या 24 तासात 117 मृत्यू झाले.

 

यापैकी 82.91% मृत्यू सहा राज्यातले आहेत.गेल्या 24 तासात  महाराष्ट्रात सर्वात जास्त 57 मृत्यू झाले तर पंजाब मध्ये 18 आणि केरळमध्ये 13 मृत्यूंची नोंद झाली.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image006WAG5.jpg

19 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशात गेल्या 24 तासात कोविड-19 च्या एकाही रुग्णांची नोंद नाही. गुजरात, राजस्थान, चंडीगड, ओडिशा, हिमाचल प्रदेश,झारखंड, बिहार, पुडुचेरी, लक्षद्वीप, मणिपूर, दमण दीव आणि दादरा नगर हवेली, मिझोरम, लडाख (केंद्र शासित प्रदेश ), अंदमान निकोबार बेटे, मेघालय, सिक्कीम,त्रिपुरा, नागालँड आणि अरुणाचल प्रदेश यांचा यात समावेश आहे.

 

* * *

Jaydevi PS/N.Chitale/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1704370) Visitor Counter : 105


Read this release in: English