संरक्षण मंत्रालय
अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांचा भारत दौरा
Posted On:
10 MAR 2021 8:52PM by PIB Mumbai
अमेरिकेचे संरक्षणमंत्री जनरल लॉयड जे ऑस्टिन हे 19 ते 21 मार्च 2021 दरम्यान भारत दौर्यावर येणार आहेत. या भारत भेटीदरम्यान ऑस्टिन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भारत सरकारच्या इतर वरिष्ठ मान्यवरांची भेट घेतील अशी अपेक्षा आहे.
या भेटीदरम्यान उभय पक्ष द्विपक्षीय सुरक्षा सहकार्य बळकट करण्याच्या मार्गांवर आणि मुक्त, खुला आणि सर्वसमावेशक इंडो-पॅसिफिक (भारत-प्रशांत) प्रदेश टिकवून ठेवण्यासाठीची प्रादेशिक सुरक्षा आव्हाने आणि सामान्य हितसंबंधांबद्दल विचारांची देवाणघेवाण करणे अपेक्षित आहे. संरक्षण सहकार्याविषयीची चर्चा दोन्ही देशांमधील सैन्य ते सैन्य सहकार्य आणि संरक्षण व्यापार आणि उद्योग सहकार्य कसे मजबूत करू शकतात यावर देखील लक्ष केंद्रित करेल.
पहिल्या परदेश दौर्याचा भाग म्हणून ऑस्टिन यांचा भारत दौरा भारत-अमेरिका धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूर करण्यावर भर देतो.
***
M.Chopade/S.Mhatre/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1703968)