पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय

रत्नागिरी येथे एकात्मिक रिफायनरी-सह-पेट्रोकेमिकल संकुल

Posted On: 10 MAR 2021 7:57PM by PIB Mumbai

 

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (आयओसीएल), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) या तेल क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रमांनी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यामधल्या बाबुलवाडी येथे 60 एमएमटीपीए (दशलक्ष मेट्रिक टन प्रति वर्ष ) रिफायनिंग (शुद्धीकरण) क्षमता असलेले एकात्मिक रिफायनरी-सह-पेट्रोकेमिकल संकुल स्थापित करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारशी सल्लामसलत करून वरील तीनही सार्वजनिक उपक्रमांनी प्रस्तावित रिफायनरीचे ठिकाण निश्चित केले होते. तथापि, दिनांक 02.03.2019 रोजीच्या राज्य शासनाच्या अधिसूचनेद्वारे रिफायनरी-सह-पेट्रोकेमिकल प्रकल्पाकरिता जमीन अधिग्रहणासाठी 18.05.2017 रोजी दिलेली आधीची अधिसूचना मागे घेण्यात आली आहे.

स्थानिक जनतेला या तेलशुद्धीकरण प्रकल्पाच्या फायद्यांबद्दल सजग करण्यासाठी तसेच पर्यावरणावरील दुष्परिणामांविषयी त्यांच्यातील गैरसमज दूर करण्यासाठी रत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेडने (आरआरपीसीएल) मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्याद्वारे तसेच घरोघरी जाऊन जनजागृती मोहीम राबविली.

राज्यसभेमध्ये हिशे लाचुंगपा यांनी राज्यसभेत आज विचारलेल्या प्रश्नाला दिलेल्या लिखित उत्तरात केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू व पोलाद मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ही माहिती दिली.

***

M.Chopade/V.Joshi/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1703944) Visitor Counter : 137


Read this release in: English