अर्थ मंत्रालय

500 कोटी रुपयांचे बनावट इनव्हाईस रॅकेट डीजीजीआयच्या नागपूर विभागीय युनिटने आणले उघडकीला

Posted On: 09 MAR 2021 7:06PM by PIB Mumbai

नागपूर, 9 मार्च 2021

बनावट इनव्हाईस विरोधात सुरु असलेल्या अभियानाअंतर्गत नागपूर विभागीय युनिटच्या नाशिक प्रादेशिक युनिट डीजीजीआय म्हणजे जीएसटी गुप्तविभाग महासंचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रात अनेक  व्यावसायिक इमारती आणि  निवासी इमारतीत शोध मोहीम घेतली.

जीएसटी नोंदणी घेतलेली अनेक आस्थापने अस्तित्वात नसल्याचे या तपासात आढळून आले.केवळ बनावट जीएसटी व्यवहारासाठी ही आस्थापने निर्माण केल्याचे लक्षात आले आहे.याचा सूत्रधार जळगावस्थित असल्याचे तपासादरम्यान पकडण्यात आलेल्या  व्यक्तींच्या चौकशीतून निष्पन्न झाले आहे. बनावट आस्थापनांच्या नोंदणीसाठी त्याने काही  पॅन क्रमांक आणि बँक तपशील घेऊन त्यांच्या मोबाईल क्रमांक आणि ई मेल आयडीचा  वापर त्यासाठी केला.

या सूत्रधाराच्या मालकीच्या एका बनावट कंपनी खेरीज त्याने, मुंबई, पुणे आणि जळगाव इथे जीएसटी नोंदणी द्वारे 17 बनावट कंपन्या काढल्याचे त्याच्या चौकशीत निष्पन्न झाले आहे.

कोणत्याही मालाचा किंवा सेवेचा पुरवठा किंवा स्वीकार न करणाऱ्या या 18 बनावट कंपन्यानी 500 कोटीचे बनावट व्यवहार करत सुमारे  46.50 कोटी रुपयांचे इनपुट टॅक्स क्रेडीट फसवणुकीने घेतले आहे.   

 

M.Chopade/N.Chitale/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1703603) Visitor Counter : 111


Read this release in: English