माहिती आणि प्रसारण मंत्रालय

आंतरराष्ट्रीय महिला दिन - कोणत्याही मोबदल्याशिवाय झटणाऱ्या गृहिणीचा आदर करण्याचे विद्वानांचे आवाहन


माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या सहयोगाने ‘कोविड काळातील लिंगभेद आणि कामे’ या संकल्पनेवर आधारित वेबिनार

प्रविष्टि तिथि: 08 MAR 2021 8:51PM by PIB Mumbai

मुंबई, 8 मार्च 2021

स्त्रिया या कोणत्याही समाजाचा केंद्रबिंदू असतात त्यांना नेतृत्वाची भूमिका स्वीकारण्यासाठी प्रोत्साहन दिले गेले पाहिजे, असे प्रतिपादन एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या उपकुलगुरू शशिकला वंजारी यांनी केले. त्या आज ‘कोविडकाळातील लिंगभेद  आणि कामे’ या संकल्पनेवर आधारित  वेबिनारमध्ये बोलत होत्या. आंतरराष्ट्रीय महिला दिन 2021 निमित्त पत्र सूचना कार्यालय, मुंबई आणि एसएनडीटी महिला विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने हा वेबिनार आयोजित करण्यात आला होता.

फक्त 3.5 टक्के महिलांना पुरुषांच्या समकक्ष वेतन मिळते असे  ऍडव्हान्स सेंटर फोर वुमन स्टडीज ऑफ टीस येथील माजी आणि सध्या एसएनडीटी महिला विद्यापीठाशी संबंधित प्रोफेसर विभूती पटेल यांनी केले. यावेळी लिंगभेद आणि स्त्री हक्काच्या ख्यातनाम अभ्यासकांनी कोविड काळात दिसून आलेल्या लिंग विषमतेचा उल्लेख केला. ही लिंग विषमता मनरेगा मध्ये कामासाठी स्त्रियांपेक्षा पुरुषांना प्राधान्य, अनिश्चितेचे सावट असलेल्या वयोवृद्ध, दिव्यांग आणि रोजगार गमावलेल्यांप्रमाणेच स्त्रिया यांमध्ये दिसून आली,  अश्या प्रकारचे दाखले देणाऱ्या अनेक अभ्यासपूर्ण निरीक्षणांचा त्यांनी उल्लेख केला.

कमावता आणि काळजी घेणारी अश्या अनुक्रमे पुरुष आणि स्त्री यांच्या पारंपारिक  भूमिका बदलता याव्या यासाठी कोणताही मूलभूत पाया नाही असे प्रतिपादन टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडच्या सहकारी संचालक ज्योती पाटणकर यांनी केले. लिंगभेदाशी संबंधित ठाम कल्पना आणि त्यासंदर्भात मिळणारी पक्षपाती वागणूक याबद्दल कॉर्पोरेट अग्रणींनी प्रश्न उपस्थित केले. या महामारीदरम्यान स्त्रियांना सोसावे लागलेल्या त्रासामुळे इतक्या वर्षात त्यांनी कमावलेले गमवावे लागले असे त्यांनी सांगितले.

तृतीयापंथीयांच्या हक्कासंदर्भातील कार्यकर्ते मानवेंद्र सिंग गोहिल यांनी ट्रान्सजेंडर समुदायाने तोंड दिलेल्या अडचणी आणि त्यांना समाजात उजळ माथ्याने जगण्याचा हक्क नाकारला जातो, यावर बोट ठेवले.

मनीष देसाई, व्यवस्थापकीय संचालक , (पश्चिम विभाग)  पत्रसूचना कार्यालय यांनी या वेबिनारचे नियोजन तसेच संयोजन केले होते

 

 

M.Chopade/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1703332) आगंतुक पटल : 294
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English