माहिती आणि प्रसारण मंत्रालय
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त फिल्म डिव्हिजनच्या वतीने चित्रपट महोत्सव आणि वेबिनारचे आयोजन
प्रविष्टि तिथि:
07 MAR 2021 8:18PM by PIB Mumbai
फिल्म डिव्हिजन आणि चिल्ड्रेन्स फिल्म सोसायटी, भारत यांच्या सहकार्याने 8 ते 10 मार्च, 2021 या कालावधीत 'आव्हान निवडा' या यंदाच्या महिला दिनाच्या संकल्पनेवर आधारित आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जाणार आहे. आणि तीन दिवसांच्या या उत्सवात यंदाच्या संकल्पनेवर आधारित माहितीपट आणि चित्रपट तसेच संबंधित विषयांवरील वेबिनारचा समावेश आहे.

फिल्म्स डिव्हिजन संकुल, मुंबई येथे 8 मार्च 2021 रोजी सकाळी ११.०० वाजता फिल्म्स डिव्हिजनच्या महासंचालक स्मिता वत्स शर्मा यांच्या नेतृत्वात औचित्यपूर्ण उद्घाटन समारंभाने या सोहळ्याला सुरुवात होईल. त्यानंतर, 'भारतातील वैकल्पिक तंटा निवारण : संक्षिप्त आढावा' या विषयावर वेबिनार होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या वकील आणि वरिष्ठ मध्यस्थ आशा गोपालन नायर या वेबिनारच्या प्रमुख वक्त्या असतील. त्याच दिवशी दुसऱ्या वेबिनारमध्ये , तिरुअनंतपुरम येथील प्रख्यात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. अनुपमा आर या ‘महिलांना भेडसावणारी आरोग्यविषयक आव्हाने’ या विषयावर आपले विचार मांडतील.

आंतरराष्ट्रीय महिला दिन सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे , या महोत्सवात दाखविण्यात येणारे माहितीपट आणि चित्रपटांच्या माध्यमातून आव्हान निवडा ही भावना अधोरेखित करणे. फिल्म डिव्हिजन आणि सीएफएसआय यांनी या चित्रपटांची निर्मिती केली असून हे चित्रपट 8 मार्च ते10 मार्च , 2021 या कालावधीत www.filmsdivision.org/DocumentaryoftheWeek आणि https://www.youtube.com/user/FilmsDivision या संकेतस्थळावर प्रसारित केले जातील.
***
M.Chopade/S.Chavhan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1703047)
आगंतुक पटल : 136
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English