दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
गोवा विभागीय स्तरावरील निवृत्तीवेतन व डाक अदालत 17 मार्च रोजी
Posted On:
05 MAR 2021 4:00PM by PIB Mumbai
पणजी, 5 मार्च 2021
टपालखात्याच्या सेवेशी संबधीत सदस्य आणि टपालखात्यातील निवृतांच्या तक्रारी/समस्या ऐकण्यासाठी गोवा टपाल विभाग विभागीय स्तरावरील पेन्शन व डाक अदालत 17.03.2020 रोजी 11.00 ते 12.00 या कालावधीत वरिष्ठ सुपरिटेंडन्ट कार्यालय, टपालखाते, गोवा विभाग, पणजी येथे भरणार आहे.
- ज्या तक्रारी वा समस्यांना सहा आठवड्यांनंतरही उत्तर मिळालेले नाही त्यांचीच दखल घेतली जाईल.
- खालील अधिकाऱ्यांना उल्लेखून तक्रार लिहावी आणि व्यक्तिशः किंवा टपालातून एएसपी (मुख्य कार्यालय) O/O वरिष्ठ सुपरिटेन्डन्ट , टपाल कार्यालय, गोवा विभाग, पणजी 403001 या पत्त्यावर पोचवावी.
- एका अर्जात एकच तक्रार मांडावी.
- मूळ तक्रार कोणत्या अधिकाऱ्याकडे केली होती त्याचे नाव, हुद्दा, तक्रार केल्याची तारीख याचा स्पष्ट उल्लेख असावा.
- मूळ अर्जाच्या प्रतीसोबत तक्रारअर्ज 13.03.2021 च्या पर्यंत पोचेल याची काळजी घ्यावी.
निवृत्तीवेतन व डाक अदालत 17.03.2021 ला 11.00 ते 12.00 वाजता वरिष्ठ सुपरिटेंडन्ट कार्यालय, टपालखाते, गोवा विभाग, पणजी 403001 येथे भरणार आहे. तक्रारदार वा निवृत्तीवेतनधारक इच्छा असल्यास स्वखर्चाने त्याला उपस्थित राहू शकतात.
* * *
M.Chopade/V.Sahajrao/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1702679)
Visitor Counter : 153