दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

पोस्टमास्टर जनरल कार्यालयात 30 मार्च रोजी 47 वी प्रादेशिक स्तरीय डाक अदालत


तक्रार स्वीकारण्याची शेवटची तारीख 12.03.2021

Posted On: 02 MAR 2021 9:53PM by PIB Mumbai

पणजी, 2 मार्च 2021

टपाल सेवा देशाच्या सामाजिक-आर्थिक जीवनाचा अविभाज्य भाग असून प्रत्येक नागरिकाच्या जीवनाला आभासी स्पर्श करतात. टपाल  विभाग आपल्या ग्राहकांच्या पूर्ण समाधानासाठी सेवा पुरवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत असताना, अधूनमधून संवादात अंतर आणि सेवेत दोष अशा घटना घडतात ज्यामुळे  तक्रारींचे प्रमाण वाढते. अशा तक्रारींचे प्रभावीपणे  निवारण करण्यासाठी टपाल विभाग वेळोवेळी अदालत आयोजित करतो ज्यात विभागाचे अधिकारी नाराज ग्राहकांना भेटतात, त्यांच्या तक्रारींबद्दल तपशील गोळा करतात आणि लवकरात लवकर तोडगा काढण्याचा प्रयत्न करतात.

पोस्टमास्टर जनरल, गोवा विभाग, पणजी 403001 हे आपल्या  कार्यालयात 30.03.2021 रोजी सकाळी 11 वाजता प्रादेशिक  स्तरीय डाक अदालत घेणार आहेत.

गोवा विभागातील टपाल सेवांबाबतच्या तक्रारी ज्या 6 आठवड्यांत निकाली काढल्या गेल्या नाहीत, त्या डाक अदालतमध्ये विचारात घेतल्या जातील. मेल, स्पीड पोस्ट, काउंटर सर्व्हिसेस, सेव्हिंग्ज बँक आणि मनी ऑर्डरचे पैसे न मिळणे यासंबंधी तक्रारींचा विचार केला जाईल. उपस्थित केलेल्या तक्रारींमध्ये ज्या अधिकाऱ्यांकडे  मूळ तक्रार केली होती ती  तारीख, त्यांचे नाव व पद यासारख्या बाबींचा तपशील असावा. इच्छुक ग्राहक टपाल सेवांसंबंधी तक्रारी के.बालराजू , सचिव, डाक अदालत आणि सहायक संचालक टपाल सेवा , पोस्टमास्टर जनरल यांचे कार्यालय, गोवा विभाग, पणजी 403001 यांच्याकडे पाठवू शकतात. तक्रार स्वीकारण्याची अंतिम तारीख  12.03.2021 आहे.

 

 

 

 

 S.Tupe/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1702066) Visitor Counter : 99


Read this release in: English