रेल्वे मंत्रालय

भारतात प्रथमच पश्चिम रेल्वेच्या गाड्यांमध्ये रेल्वे अपघात रोखण्यासाठी मोबाइल ट्रेन रेडिओ कम्युनिकेशन (एमटीआरसी) प्रणाली बसवण्यात आली

Posted On: 01 MAR 2021 5:01PM by PIB Mumbai

 

पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल यांनी आज दिनांक 1 मार्च 2021 रोजी मुंबईतील विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयात नव्याने स्थापित  मोबाइल ट्रेन रेडिओ कम्युनिकेशन (एमटीआरसी) प्रणालीचे उद्घाटन केले. मोबाइल ट्रेन रेडिओ कम्युनिकेशन  प्रणाली एक प्रभावी आणि प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज संपर्क प्रणाली आहे जी प्रभावी संपर्काद्वारे रेल्वे अपघात रोखण्यात आणि विलंब कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते. ती नियंत्रण केंद्र आणि स्टेशन मास्टर यांच्यासह रेल्वे कर्मचाऱ्यांशी त्वरित आणि नियमित  संवाद साधण्यास मदत करते.

एमआरटीसी विमान वाहतुकीच्या  एअर ट्रॅफिक कंट्रोल (एआरसी) प्रमाणेच काम करते. ही यंत्रणा रेल्वेगाडी आणि नियंत्रण कक्ष यांच्यातील संवादावर देखरेख ठेवेल , मागोवा घेईल आणि मदत करेल, ज्यामुळे रेल्वे वाहतूक सुरळीत  होईल तसेच दुर्घटना टाळण्यास मदत होईल, असे आलोक कंसल  म्हणाले.

एमटीआरसी प्रणालीच्या गरजेबाबत सांगताना कंसल म्हणाले, भारतात प्रथमच एमटीआरसी प्रणाली बसवण्यात आली आहे. हा भारतीय रेल्वेचा ऐतिहासिक निर्णय आहे. चर्चगेट ते विरारदरम्यान धावत असलेल्या  100 पैकी 90 डब्यांमध्ये  ही नवीन प्रणाली आधीच बसवण्यात आली आहेया मार्गावर 1300 हून अधिक फेऱ्यांच्या माध्यमातून दररोज 3.4 दशलक्ष प्रवासी वाहतूक केली जाते.

 

नवीन प्रणाली सध्याच्या रेल्वे व्यवस्थापन प्रणालीशी जोडण्यात आली आहे, जेणेकरून नियंत्रक गाडीचा क्रमांक तसेच कॅब नंबर कोडचा वापर करून चालक आणि गार्डशी संवाद साधू शकतात. आपत्कालीन परिस्थितीत एमटीआरसीकडे ब्रॉडकास्ट कॉलचीही तरतूद आहे. विभाग नियंत्रक सर्व मोटारमन / गाड्यांच्या गार्डला ब्रॉडकास्ट कॉल करू शकतो आणि रेल्वे प्रवाशांसाठी देखील अशी घोषणा केली जाऊ शकते. एमटीआरसी कॉल्स कनेक्ट करण्यासाठी सर्वात कमी  म्हणजे 300 मिलिसेकंद इतका वेळ घेते. यात वन टच डायलिंगची तरतूद आहे ज्याद्वारे त्वरित संवाद  सुनिश्चित होतो.

 

विभागाने केलेल्या प्रयत्नांमुळे दररोज होणारे अपघाती मृत्यू आणि जखमींची संख्या 2019 मधील 4.50 वरून 2020 मध्ये 1.30 पर्यंत कमी झाली आहे याकडेही आलोक कंसल यांनी  लक्ष वेधले.

पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकानी सादर केलेले पीपीटी येथे पाहता येईल.

***

S.Tupe/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1701749) Visitor Counter : 238


Read this release in: English