माहिती आणि प्रसारण मंत्रालय
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त भारतीय शास्त्रज्ञांवरील चित्रपटांचे चित्रपट विभागाच्या संकेतस्थळावर दिवसभर प्रसारण केले जात आहे
Posted On:
28 FEB 2021 8:20PM by PIB Mumbai
मुंबई, 28 फेब्रुवारी 2021
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त फिल्म्स डिव्हिजन अर्थात चित्रपट विभागाच्या संकेतस्थळावर भारतीय शास्त्रज्ञांचे योगदान आणि भारतीय विज्ञान संस्था बंगळुरू या संस्थेचा गौरवशाली इतिहास या विषयांवरील आठ माहितीपटांचे दिवसभर प्रसारण केले जात आहे.आज दिनांक 28 फेब्रुवारी 2121 रोजी फिल्म्स डिव्हिजनच्या संकेतस्थळावर आणि यू ट्यूब वाहिनीवर हे चित्रपट प्रदर्शित होत आहेत.
होमी भाभा -अ सायंटिस्ट इन अॅक्शन(22मिनिटे/इंग्लिश/1973) भारतातील महान अणुशास्त्रज्ञ होमी भाभा ,जे स्वतःच एक संस्था होते, आचार्य जगदीश चंद्र बोस (39 मिनिटे/इंग्लिश/1958)या आचार्य जगदीश चंद्र बोस यांच्या लहानपणापासून ते वनस्पतीशास्त्र या विषयावरील वनस्पतींच्या सजीवतेचे अस्तित्व सिध्द करण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे चित्रण करणारा माहितीपट, नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ सी. व्ही.रामन (17मिनिटे/इंग्लिश/1982)यांचा चरीत्रपट, डॉ. एम .विश्वैश्वरैय्या (19मिनिटे/इंग्लिश/1960)यांचा साधेपणा आणि तेजस्वी शैक्षणिक कारकिर्दीचे आणि अभियांत्रिकी क्षेत्रात त्यांनी मिळविलेल्या संस्मरणीय विजयांचे चित्रण करणारा माहीतीपट, सुप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ आणि अंतराळशास्त्रज्ञ विक्रम साराभाई (40मिनिटे/इंग्लिश/1995)ज्यांना भारतीय अंतरीक्ष कार्यक्रमाचे जनक मानले जाते ,त्यांच्या जीवन आणि कार्यावरील चरीत्रपट, जनतेचे राष्ट्रपती (52 मिनिटे/इंग्लिश/2016)भारताचे माजी राष्ट्रपती आणि अंतराळ शास्त्रज्ञ डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या वरील चरीत्रपट,,भारताचे एडिसन जी.डी.नायडू (52 मिनिटे/इंग्लिश/2018)या महान संशोधक आणि इंजिनिअर जी.डी.नायडू आणि भारतीय विज्ञान संस्था बंगळुरू यांची 100 वर्षे (30 मिनिटे/इंग्लिश/2009)भारतीय विज्ञान संस्था बंगळुरू गौरवशाली इतिहासावर प्रकाश टाकणारा चित्रपट इत्यादी चित्रपटांचा समावेश आहे.
राष्ट्रीय विज्ञान दिनाचे महत्त्व देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्यासाठी फिल्म्स डिव्हिजन नेहरू विज्ञान केंद्र, मुंबई विज्ञान माध्यम केंद्र, आय एस ई आर पुणे, चिल्डेन्स फिल्म्स सोसायटी ऑफ इंडिया (CFSI) फेडरेशन ऑफ फिल्म्स सोसायटीज ऑफ इंडिया आणि विज्ञान प्रसार आणि इतर अनेकांच्या सहकार्याने या माहितीपटांचे दिवसभर प्रसारण केले जात आहे.
हे माहितीपट दिनांक 28 फेब्रुवारी 2021 रोजी दिवसभर www.filmsdivision.org/DocumentaryoftheWeek आणि https://www.youtube.com/user/FilmsDivision यावर 24 तास प्रसारित होत राहतील.
* * *
Jaydevi PS/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1701569)
Visitor Counter : 251