माहिती आणि प्रसारण मंत्रालय

सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते एस.सुखदेव यांच्या पुण्यातिथीनिमित्त फिल्म डिव्हिजनकडून श्रध्दांजली

Posted On: 28 FEB 2021 5:55PM by PIB Mumbai

मुंबई, 28 फेब्रुवारी 2021

 

सर्वोत्कृष्ट माहितीपट निर्माते एस.सुखदेव यांना त्यांच्या 42 व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या चित्रपट निर्मितीतील महत्वपूर्ण योगदानाची आठवण करत फिल्म डिव्हिजन दिनांक 1 मार्च 2021 रोजी त्यांचे तीन चित्रपट प्रदर्शित करत आहे.फिल्म डिव्हिजन त्यांच्या संकेतस्थळावर आणि यू ट्यूब वाहिनीवर दिवसभर या चित्रपटांचे प्रसारण करणार आहे.

यात ‘’एक आकार ‘’ (21 मिनिटे /हिंदी/1985),  खिलौनेवाला हा गुलजार यांनि दिग्दर्शित केलेला  सुखदेव यांच्या वरील  लघुचरीत्रपट (19 मिनिटे/हिंदी/1971), राष्ट्रीय एकात्मता या संकल्पनेवरील सुखदेव यांचा चित्रपट आणि ‘ द लास्ट अडियू’ (92मिनिटे/इंग्रजी/2013) हा  शबनम सुखदेव या त्यांच्या मुलीने भूतकाळ उलगडण्याच्या वैयक्तिकपणे घेतलेल्या शोधावरील आणि स्वतःच्या वडील आणि मुलगी या नातेबंधावरील माहितीपटाचा समवेश आहे.

कृपया  https://filmsdivision.org/ या संकेतस्थळावर लॉगइन करा

साप्ताहिक  माहितीपट पाहण्यासाठी https://www.youtube.com/user/FilmsDivision वर क्लिक करा आणि चित्रपट पहाण्यासाठी भेट द्या.


* * *

Jaydevi PS/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1701540) Visitor Counter : 120


Read this release in: English