संरक्षण मंत्रालय

व्हाइस ऍडमिरल आर हरी कुमार यांनी नौदलाच्या पश्चिम कमांडच्या प्रमुखपदाचा कार्यभार स्वीकारला

प्रविष्टि तिथि: 28 FEB 2021 5:50PM by PIB Mumbai

मुंबई, 28 फेब्रुवारी  2021

 

व्हाइस ऍडमिरल आर हरी कुमार (PVSM, AVSM, VSM) यांनी आज मुंबईत पश्चिम नौदल कमांडच्या प्रमुखपदाचा कार्यभार स्वीकारला.  भारतीय नौदलात गेली 40 वर्षे उत्कृष्ट सेवा देऊन निवृत्त होणारे व्हाइस ऍडमिरल अजित कुमार (PVSM, AVSM, VSM, ADC) यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला.

पश्चिम नौदल  कमांडच्या मुंबई इथल्या  मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात नव्या आणि आधीच्या प्रमुखांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर पदाची सूत्रे सुपूर्द करण्याचा आणि स्वीकारण्याचा औपचारिक समारंभ झाला. पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर व्हाइस ऍडमिरल आर हरी कुमार यांनी गौरव स्तंभ स्मारक इथे पुष्पचक्र अर्पण केले.

व्हाइस ऍडमिरल आर हरी कुमार राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे विद्यार्थी असून 1 जानेवारी  1983 ला ते भारतीय नौदलाच्या सेवेत रुजू झाले. विमानवाहू आयएनएस विराट युद्धनौका आणि  विनाशिकेसह पाच नौकांचे नेतृत्व त्यांनी केले आहे. किनाऱ्यावरील तसेच नौकेवरील महत्त्वाच्या नियुक्त्या त्यांनी केल्या आहेत. सेशल्स सरकारचे नौदल सल्लागार म्हणून त्यांनी काम केले आहे.

* * *

Jaydevi PS/S.Kakade/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1701538) आगंतुक पटल : 194
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English