माहिती आणि प्रसारण मंत्रालय
कोविड लसिकरण आणि आत्मनिर्भर भारत जनजागृती मोहिमेचा नितीन गडकरी यांच्या हस्ते शुभारंभ
माहिती आणि प्रसारण मंत्रालयातील प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो, पुणेच्या अधिनस्त क्षेत्रिय लोकसंपर्क ब्युरो, नागपूरचा उपक्रम
Posted On:
28 FEB 2021 1:52PM by PIB Mumbai
नागपूर, 28 फेब्रुवारी 2021
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो, पुणे आ आणि क्षेत्रिय लोकसंपर्क ब्युरो, नागपूर यांच्यावतीने कोविड-19 लसिकरण आणि आत्मनिर्भर भारत या विषयावर नागपूर जिल्ह्यातील विविध तालुक्यात जनजागृतीसाठी तयार केलेल्या बहुमाध्यमी मोबाईल व्हॅनवरील फिरत्या प्रदर्शनाचे तसेच कलापथक मोहिमेचा शुभारंभ केंद्रीय रस्ते वाहतूक आणि केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते वर्धा मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी आज करण्यात आला .याप्रसंगी प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो, पुणेचे सहायक-संचालक निखील देशमुख, पत्र सुचना कार्यालयाचे सहायक संचालक शशीन राय, क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो, कोल्हापूर विभागाचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, माध्यम समन्वय अधिकारी अनिल गडेकर प्रामुख्याने उपस्थित होते.
माहिती आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो, पुणे यांच्यावतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यात जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ आणि आरोग्य विभाग, महाराष्ट्र यांचे सहकार्य लाभले आहे. या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील ३६ जिल्हयात १६ व्हॅन्स द्वारे फिरते बहुमाध्यमी प्रदर्शन आयोजित करून तसेच कलापथकांच्या माध्यमातून लोकांमध्ये कोविड-19 लसिकरण मोहिम आणि आत्मनिर्भर भारत अभियानाबद्दल जनजागृती निर्माण करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो, नागपूरच्यावतीने नागपूर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील गावांमध्ये १० दिवस व्हॅनद्वारे फिरते बहुमाध्यमी प्रदर्शनाच्या माध्यमातून ही मोहिम राबविण्यात येत आहे.
या उपक्रमांतर्गत लसिकरणाबाबतची माहिती, आत्मनिर्भर भारत अंतर्गत विविध उपक्रम आणि कोविड-19 विषयक नियमांबाबतची माहिती जिल्ह्यातील नागरीकांपर्यंत पोहचविणे, हा या मागील उद्देश आहे. लसिकरणाविषयी असलेले गैरसमज आणि अफवांबाबत जनतेला जागृत करणे, आत्मनिर्भर भारताच्या उभारणीसाठी सरकार करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती फिरत्या बहुमाध्यमी प्रदर्शनाच्या माध्यमातून लोकांना करून देण्यात येणार आहे.
यावेळी कलापथकातील कलाकारांच्या माध्यमातून कार्यक्रमाचे सादरीकरण करून लोकांपर्यंत जनजागृती संदेश पोहचविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जनजागृती मोहिमेसाठी विभागीय आयुक्त कार्यालय, नागपूर, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा आरोग्य विभाग आणि जिल्हा माहिती कार्यालय यांचे सहकार्य लाभले आहे.
या मोहिमेच्या यशस्वितेसाठी प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो, पुणेचे संचालक प्रकाश मकदुम यांच्या मार्गदर्शनात प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो, पुणेचे सहायक- संचालक निखील देशमुख, क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो, कोल्हापूरचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत, क्षेत्रीय प्रचार सहायक संजय तिवारी, श्रीमती संजीवनी निमखेडकर, जी नरेश आणि रंगधून कलामंच, नागपूर आणि त्यांच्या चमूचे सदस्य परिश्रम घेत आहेत.
* * *
S.Rai/D.Wankhede/D.Dubey/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1701492)
Visitor Counter : 176