माहिती आणि प्रसारण मंत्रालय

थोर क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांना श्रद्धांजली म्हणून चरित्रपट प्रदर्शित केला जाणार

Posted On: 26 FEB 2021 6:53PM by PIB Mumbai

मुंबई, 26 फेब्रुवारी 2021

भारताचा अभिमान आणि आत्मविश्वास जागृत करण्याचा स्वातंत्र्यलढा  हा महत्त्वपूर्ण प्रवास होता, या लढ्यात  थोर क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद, यांनी तरुणांच्या गटाचे नेतृत्त्व केले आणि देशवासियांमधअये देशभक्तीची ज्योत प्रज्ज्वलित केली. भारताच्या या थोर सुपुत्राच्या स्मृतिदिनानिमित्त 27 फेब्रुवारी 2021 रोजी चित्रपट विभागातर्फे आझाद यांचे जीवन आणि कार्य यावर प्रकाश टाकणाऱ्या  चरित्रात्मक माहितीपटाचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. पियुष बोरकर दिग्दर्शित चंद्रशेखर आझाद (18 मिनिटे/हिंदी/1993) हा माहितीपट, चित्रपट विभागाच्या संकेतस्थळावर आणि यू ट्यूब चॅनेलवर 24 तास प्रदर्शित केला जाणार आहे.

जालियनवाला बाग हत्याकांडाचा  चंद्रशेखर आझाद यांच्यावर कसा परिणाम झाला आणि  ते कसे स्वातंत्र्य चळवळीत ओढले गेले यावर हा चरित्रपट प्रकाश टाकतो. हा सिनेमा https://filmsdivision.org/Documentary या ठिकाणी सप्ताहात दाखविला जाईल आणि https://youtube.com/user/FilmsDivision या ठिकाणी 27 फेब्रुवारी 2021 रोजी दाखविला जाईल, यातून चंद्रशेखर आझाद यांचे देशप्रेम, पराक्रम आणि निःस्वार्थीपणा स्मरला जाईल.

 

Jaydevi PS/S.Shaikh/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1701173) Visitor Counter : 209


Read this release in: English