दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
सर्कल डाक अदालतीचे आयोजन
Posted On:
25 FEB 2021 10:00PM by PIB Mumbai
पणजी, 25 फेब्रुवारी 2021
मुख्य पोस्टमास्टर जनरल, महाराष्ट्र सर्कल मुंबई यांनी दि. 22.03.2021 रोजी 114वी डाक अदालतीचे आयोजन केले आहे. महाराष्ट्र आणि गोवा राज्याशी संबंधित पोस्टाच्या सेवेविषयी किंंवा कामकाजाबद्दल तक्रारींचे निवारण सहा आठवड्याच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळालेले नसेल अशा तक्रारींची या डाक अदालतमध्ये दखल घेतली जाईल. विशेषतः टपाल वस्तू/ मनी ऑर्डर / बचत खाते/ प्रमाणपत्र, इ. बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशीलासह केलेला असावा उदा. तारीख, तक्रार पाठविलेल्या अधिकाऱ्याचे नाव व पादनाव इ.. अदालत मुख्य पोस्टमास्टर जनरल, महाराष्ट्र सर्कल मुंबई 400001 यांच्या कार्यालयामध्ये आयोजित करण्यात येणार आहे.
संबंधितांनी डाक सेवेबाबतची आपली तक्रार श्री एच एम मंगेश, सहायक निदेशक, डाक सेवा (ज. शी. ) आणि सचिव डाक अदालत, मुख्य पोस्टमास्टर जनरल यांचे कार्यालय, मुंबई जी . पी. ओ . इमारत, दुसरामाळा , मुंबई, 400001, यांच्या नावे दोन प्रतिसह दि. 05.03.2021 पर्यंत अथवा त्यापुर्वी पोहोचेल अशा रितीने पाठवावी, नंतर आलेल्या तक्रारींची दखल घेतली जाणार नाही. प्रपत्र महाराष्ट्र पोस्टल सर्कलच्या वेबसाईट www.maharashtrapost.gov.in वर उपलब्ध आहे.
* * *
PIB GOA/VK/DR
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1700932)
Visitor Counter : 108