अर्थ मंत्रालय
एलआयसी कडून बिमा ज्योती ही नवी योजना जारी
सिंगल प्रीमियम वाढीमध्ये गोवा एलआयसी ठरले देशात अव्वल
Posted On:
22 FEB 2021 6:55PM by PIB Mumbai
पणजी, 22 फेब्रुवारी 2021
एलआयसी, भारतीय आयुर्विमा महामंडळाने बचत आणि सुरक्षा कवच असा दुहेरी लाभ देणारी बिमा ज्योती ही योजना बाजारात आणली आहे. भांडवली बाजाराशी जोडलेली नसलेली ही नॉन लिंक, नॉन पार्टीसिपेटिंग, वैयक्तिक, बचत योजना आहे. या योजनेअंतर्गत मुदत समाप्तीनंतर एक रकमी रक्कम आणि पॉलीसीच्या मुदत कालावधीत धारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना वित्तीय पाठबळही देऊ करते. एजंटमार्फत किंवा इतर मध्यस्थांमार्फत ही योजना ऑफ लाईन घेता येईल तसेच www.licindia.in या संकेत स्थळाद्वारे थेट घेता येईल.
पॉलीसीच्या मुदत कालावधीपर्यंत प्रत्येक वर्षाच्या अखेरीला, हजार रुपयामागे 50 रुपये या दराने निश्चित हमीने रक्कमेत भर घातली जाईल.
जोखीम सुरु झाल्याच्या तारखेनंतर पॉलीसीच्या मुदत कालावधीत पॉलीसीधारकाचा मृत्यू झाल्यास,’सम अश्यूअर ऑन डेथ’आणि पॉलीसीच्या अटीनुसार हमीने भर घालण्यात आलेली जमा रक्कम देय आहे. पॉलीसीची मुदत संपण्याच्या तारखेला जीवित पॉलीसीधारकाला परिपक्वतेच्या वेळी प्रदान करण्यासाठी निश्चित करण्यात आलेली रक्कम आणि हमीने भर घालण्यात आलेली जमा रक्कम देय आहे. विशिष्ट अटींच्या अधीन, मृत्यू/मुदत समाप्ती संदर्भातले लाभ हप्त्याने घेण्याचीही सुविधा उपलब्ध आहे.
या पॉलीसीसाठी किमान ‘सम अश्यूअर’ 1,00,000/- रुपये असून कमाल मर्यादा नाही. 15 किंवा 20 वर्षाच्या मुदतीची पॉलीसी घेता येणार असून प्रीमियम देण्याची मुदत पॉलीसीचा कालावधी वजा पाच वर्षे राहील. वयाची मर्यादा किमान 90 दिवस पूर्ण आणि कमाल 60 वर्षे आहे. हप्ता वार्षिक, अर्ध वार्षिक, त्रैमासिक आणि मासिक ( मासिक हप्ता केवळ एनएसीएच मार्फत) किंवा वेतनातून कापून दिला जाऊ शकतो. कर्जाची सुविधाही उपलब्ध आहे.
घटत्या व्याज दराच्या सध्याच्या पार्श्वभूमीवर जोखीम कवचासह रकमेत हमीने निश्चीत घालण्यात येणारी निश्चित भर हे एलआयसीच्या बिमा ज्योतीचे आगळे वैशिष्ट्य आहे.
सिंगल प्रीमियम वाढीमध्ये गोवा एलआयसी विभाग देशात अव्वल ठरला असून सिंगल प्रीमियम आणि प्रथम वर्ष प्रीमियम इनकम बजेट( एफवायपीआय) आधीच पूण केले आहे. ग्राहकांच्या समाधान पूर्तीसाठी गोवा एलआयसी कटीबद्ध आहे.
* * *
S.Thakur/N.Chitale/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1700006)
Visitor Counter : 162