सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय

नागपूरातील प्रस्तावित बॉड गेज मेट्रो प्रकल्पासाठी एम एस एम ई- इनवेस्टर मेळाव्याचे आयोजन -केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते होणार उद्‌घाटन

Posted On: 18 FEB 2021 7:27PM by PIB Mumbai

नागपूर, 18 फेब्रुवारी 2021

केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय अंतर्गत नागपूरच्या एमएसएमई  डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट तसेच महा मेट्रो यांच्या संयुक्त विद्यमाने ब्रॉडगेज मेट्रो रेल्वे  प्रकल्पासाठी एम एस एम ई- इनवेस्टर  मेळाव्याचे आयोजन 20 फेब्रुवारी 2021 शनिवार रोजी  एअरपोर्ट साऊथ मेट्रो स्टेशन, वर्धा रोड येथे करण्यात आले असून  मेळाव्याच उद्‌घाटन सकाळी 10 वाजता केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री  नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार असून महामेट्रोचे  व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दिक्षितएमएसएमई  डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटचे संचालक पी.एम. पार्लेवार याप्रसंगी उपस्थित राहतील. 

नागपूरातील बस संचालक आण एम. एस. एम. ई.  युनिट्सला पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या माध्यमातून  ब्रॉडगेज मेट्रो रेल्वे  प्रकल्प चालवण्यासाठी एक मंच उपलब्ध करून देणे हा या कार्यक्रमाचा मागचा उद्देश आहे .यासाठी विदर्भातील बँकिंग आणि टूर व ट्रॅव्हल्स ऑपरेटर, नागपूर विभागातील सर्व इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष आणि  भागधारकांनाही या मेळाव्यात सहभागी होण्याच आवाहन पी.एम. पार्लेवार यांनी केले आहे.

या प्रस्तावित ब्रॉडगेज मेट्रो रेल्वे  प्रकल्पासाठी महसूल प्रारूप विषयी तसेच एमएसएमईच्या योजना संदर्भात  सविस्तर सादरीकरण महा मेट्रो नागपूर आणि एमएसएमईचे वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून या मेळाव्यात  करण्यात येणार आहे.  या योजनेचा लाभ घेण्यासाठी या मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन  आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.

S.Rai/D.Wankhede/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1699146) Visitor Counter : 95


Read this release in: English