माहिती आणि प्रसारण मंत्रालय
भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांना फिल्म्स डिव्हीजनचा सलाम
Posted On:
15 FEB 2021 9:44PM by PIB Mumbai
मुंबई, 15 फेब्रुवारी 2021
भारतीय चित्रपटांचे जनक, धुंडीराज गोविंद फाळके, म्हणजेच दादासाहेब फाळके यांनी भारतातील चित्रपट कलेची मुहूर्तमेढ रोवली आणि आपल्या देशबांधवांना अमर्यादित कल्पनारम्यतेचे दालन खुले करुन दिले. त्यांच्या महत्वाकांक्षी दूरदृष्टीने आजच्या भरभराटीला आलेल्या चित्रपटसृष्टीचा भक्कम पाया घातला. एक आख्यायिका बनलेल्या दादासाहेब फाळकेंच्या 77 व्या पुण्यतिथी व दीडशेव्या जंयती समारंभाच्या निमित्ताने 16 फेब्रुवारी 2021 रोजी फिल्म्स डिविजन आपल्या संकेतस्थळावरून तसेच युट्युब वाहिनीवरून निवडक माहितीपट आणि अँनिमेशन फिल्मचे प्रसारण करणार आहे.
ड्रीम टेक्स विंग्ज (16 मिनिटे/इंग्लिश/1972/गजानन जहागीरदार) हा दादासाहेब फाळकेंवरील चरित्रपट, फाळके चिल्ड्रन(20 मिनिटे/इंग्लिश/1994/कमल स्वरूप) हा त्यांची मुले व कौटुंबिक फोटोंवरून त्यांचे जीवन आणि व्यवसाय यांचा आलेख काढणारा चित्रपट, द पी प्लँट लीगसी (11मिनिटे/म्युझिक/2015/राम मोहन) ही दादासाहेब फाळकेंवरील अँनिमेशन फिल्म व चित्रपटसृष्टीला दुरावल्यावर, निराश झाल्यावर फाळकेंचे वाराणसीमधील जीवन आणि रंगभूमीकडे मोहरा वळवण्याचा निर्णय यावर आधारित रंगभूमी (90मिनिटे/हिंदी/2013/कमल स्वरूप) हा काल्पनिक स्वरुपाचा माहितीपट या फिल्म्सचा प्रसारणात समावेश आहे. ‘रंगभूमी’ या चित्रपटाने 2013 मध्ये सर्वोत्कृष्ट नॉन-फिचर फिल्मसाठी राष्ट्रीय फिल्म पारितोषिकासह अनेक पुरस्कार पटकावले आहेत.
या चित्रपटांचे प्रसारण 16 फेब्रुवारी 2021 ला दिवसभर https://filmsdivision.org/ Documentary of the Week आणि https://www.youtube.com/user/FilmsDivisionवरून होईल. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 022-23522252/ 09004035366 आणि publicity@filmsdivision.org
M.Chopade/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1698275)
Visitor Counter : 111