माहिती आणि प्रसारण मंत्रालय
सरोजिनी नायडू यांना आदरांजली म्हणून फिल्म्स डिव्हिजन त्यांच्या आयुष्यावरील चरित्रपट दाखवणार
Posted On:
12 FEB 2021 5:15PM by PIB Mumbai
मुंबई, 12 फेब्रुवारी 2021
भारताच्या कोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या स्वातंत्र्यसेनानी सरोजिनी नायडू यांची 141 जयंती उद्या म्हणजेच 13 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाणार आहे. यानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी फिल्म्स डिव्हिजन तर्फे त्यांच्यावरील बायोपिक म्हणजेच चरित्रपट- द नायटिंगेल ऑफ इंडिया (21 मिनिटे/इंग्रजी/1975/बी डी गर्ग) फिल्म डिव्हिजन चे संकेतस्थळ आणि यु ट्यूब चैनेलवर दाखवला जाणार आहे.
‘द नायटिंगेल ऑफ इंडिया’ या माहितीपटात, महान स्वातंत्र्यसेनानी, कवयित्री आणि भारतीय राज्याच्या पहिला महिला राज्यपाल असलेल्या सरोजिनी नायडू यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या माहितीपटात सरोजिनी नायडू यांच्या आवाजातील ‘एशियन रिलेशनशिप कॉन्फरन्स’ मध्ये दिलेले एक भाषणही रसिकांना ऐकायला मिळू शकेल.
हा चरित्रपट https://filmsdivision.org/ आठवड्याचा माहितीपट आणि https://www.youtube.com/user/FilmsDivision यावर 13 फेब्रुवारी 2021 रोजी 24 तास बघता येईल.
Jaydevi P.S/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1697418)
Visitor Counter : 149